शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाखांची फसवणूक करणारे त्रिकूट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:03 IST

गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे : बजाज फायनान्स  कंपनीच्या अधिकृत डीलरचे आयडी आणि पासवर्डचा वापर करून ओपन व्हर्च्युअल कार्ड वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावाने बनवून त्याद्वारे १८ लाख ६१८ रुपयांचे मोबाइल खरेदी करून फसवणूक करणाऱ्या मोहम्मद अल्तामश याच्यासह तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख १३ हजारांचे ३० मोबाइल हस्तगत केले.

वागळे इस्टेट येथे कंपनीचे कार्यालय आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत मुंब्रा येथील अल्तामश उनावालाने बजाज फायनान्स कंपनीचा अधिकृत वितरक नसतानाही अन्सार टॉवेलवाला (३५, रा. मुंब्रा) आणि दीपेन सोमया (३१, रा. मुलुंड) यांच्या मदतीने ही फसवणूक केली. या टोळीने  कंपनीचे राजस्थान, पंजाब, बिहारमधील अधिकृत डीलर यांचे लॉगइन आयडी तसेच पासवर्ड वापरून वेगवेळ्या ग्राहकांच्या नावाने ओपन व्हर्च्युअल कार्ड बनवून त्याच्या मदतीने १८ लाख १८ हजार ६१८ रुपयांचे मोबाइल कर्जाने खरेदी करून कंपनीची दिशाभूल केली. याप्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात कंपनीने १३ नोव्हेंबरला फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास वागळे इस्टेट पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक करीत होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, हवालदार आबुतालीब शेख, सुभाष मोरे, सुनील जाधव आणि चंद्रकांत वाळुंज आदींच्या पथकाने या तिघांनाही १३ नोव्हेंबर रोजी मुंब्य्रातून अटक केली. 

सात लाखांचे ३० मोबाइल हस्तगत nआरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. मोहम्मद अल्तामश हा बजाज फायनान्स कंपनीचा पूर्वाश्रमीचा डीलर होता. त्याच्याकडून विकलेल्या मोबाइलची कर्जवसुली होत नसल्याने कंपनीने त्याची डीलरशिप काढून घेतली होती. nपरंतु, त्यानंतर त्याने कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपींकडून आतापर्यंत सात लाखांचे विविध कंपन्यांचे ३० मोबाइल हस्तगत केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी