मुस्लीम धर्माविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:51 IST2024-09-23T17:50:22+5:302024-09-23T17:51:16+5:30
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी ५८ गुन्हे दाखल असूनही कारवाई न केल्याचा आरोप

मुस्लीम धर्माविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर
शाम धुमाळ, कसारा: मुस्लीम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे व रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी AIMIM पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅली आयोजन करण्यात आली आहे.
मुस्लिम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी ५८ गुन्हे दाखल असून देखील पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना संविधान पत्र देण्यासाठी तसेच लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी तिरंगा संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
संभाजीनगर येथून इम्तियाज झालेली यांचा ताफा निघाला असून समृद्धी महामार्ग मार्गे कसारा परिसरात आले असून भिवंडी ठाणे मुंब्रा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना कसारा मध्ये एकत्र बोलवण्यात आले असून कसारा पासून मुंबई नाशिक महामार्गाने मुंबईकडे रवाना झाले आहेत . या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने वाहन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.