आदिवासी महिलेचे बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:43+5:302021-07-02T04:27:43+5:30

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असून, त्यामुळे आता ग्रामस्थांच्या जिवावर बेतू लागले आहे. ...

Tribal woman's baby cheated | आदिवासी महिलेचे बाळ दगावले

आदिवासी महिलेचे बाळ दगावले

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असून, त्यामुळे आता ग्रामस्थांच्या जिवावर बेतू लागले आहे. हे केंद्र बंद असल्याने दुसऱ्या शहरात महिलेला प्रसूतीसाठी नेत असताना वाटेत टेम्पोतच प्रसूती होऊन बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मलंगगड परिसरातील म्हात्रे पाडा येथील वंदना वाघे यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. वंदना यांना बुधवारी रात्री १ च्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना कुटुंबीयांनी मांगरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र ते केंद्र बंद असल्याने त्यांना टेम्पोतून उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबीयांनी केला. मात्र वाटेतच त्यांची प्रसूती झाली आणि त्यात बाळाचा मृत्यू झाला. मांगरूळ आरोग्य केंद्राची मागील अनेक दिवसांपासून डागडुजी सुरू असून, त्यामुळे या भागातील रुग्णांना उपचारांसाठी बाहेरच्या शहरात जावे लागते. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Tribal woman's baby cheated