जव्हार शहरात भूगर्भातून हादरा; भूकंप की हादरा अद्याप संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 16:55 IST2021-09-13T16:53:02+5:302021-09-13T16:55:19+5:30
सन 2012 पासून सलग तीन चार वर्ष जव्हार तालुक्यात छोटे मोठे भूकंपाचे धक्के जाणवत होते, मात्र नंतर ते बंद झाले. दरम्यान मागील दोन ते तीन वर्षापासून तलासरी व डहाणू भागात भूकंपाचे धक्के सुरू आहेत, यात एखादा धक्का अतितीव्र असल्यास त्याचा हादरा जव्हारला अल्प प्रमाणात जाणवतो

जव्हार शहरात भूगर्भातून हादरा; भूकंप की हादरा अद्याप संभ्रम
- हुसेन मेमन, जव्हार
जव्हार शहरात सोमवारी दुपारी 3.16 वा. भूगर्भातून जोरदार हादरा जाणवला, नागरिक भयभीत होऊन घराबाहेर निघाले मात्र या धक्क्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, हा धक्का भूकंपाचा की भूगर्भातील हादरा याबाबत सोमवारी सुट्टी असल्याने तहसील कार्यलयातून तशी अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.
सन 2012 पासून सलग तीन चार वर्ष जव्हार तालुक्यात छोटे मोठे भूकंपाचे धक्के जाणवत होते, मात्र नंतर ते बंद झाले. दरम्यान मागील दोन ते तीन वर्षापासून तलासरी व डहाणू भागात भूकंपाचे धक्के सुरू आहेत, यात एखादा धक्का अतितीव्र असल्यास त्याचा हादरा जव्हारला अल्प प्रमाणात जाणवतो, दरम्यान सोमवारी दुपारी झालेला धक्का मोठा होता, मात्र याची मेरीला नोंद झाली की नाही हे सुट्टी असल्यामुळे समजले नाही.
भूगर्भातील हादऱ्याबाबत जिल्ह्यावरून अद्याप तशी माहिती प्राप्त झालेली नाही, नागरिकांनी भयभीत होऊ नये. आशा तमखाडे, तहसीलदार, जव्हार
दरवर्षी पावसाळ्यात सलग आठवडाभर दिवसरात्र पाऊस पडला की, असे सौम्य धक्के जाणवतात. हे हादरे भूगर्भातील हालचालींचे असावेत असा अंदाज आहे.
- मुद्दसर मुल्ला, जव्हार