शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचे; पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाईचा सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 6:02 PM

पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाईचे बालपण अत्यंत हलाखीत गेले आहे. सिद्धार्थ लहान असतांनाच आई वडिलांच्या घटस्फोट झाला .

- नितिन पंडीत

भिवंडी- शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रयत्न केले जातात मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत झाडांची राजरोस कत्तल करीत असतो. त्यातच जंगलांचा ऱ्हास होत असल्याने पर्यावरण रक्षणाची जागतिक समस्या सध्या सर्वत्र निर्मा झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही कोणतीही शासकीय मदत न घेता पर्यावरण रक्षणासाठी "एक झाड माणुसकीचं ,एक पाऊल परिवर्तनाचे" हि मोहीम हाती घेत रायगड ते सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट असा सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत देशातील नागरिकांना पर्यावरण राक्षणासोबतच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत भिवंडीतील २४ वर्षीय तरुणाने आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सिद्धार्थ गणाई असे या २४ वर्षीय पर्यावरणवादी ध्येयवेड्या तरुणाचे नाव असून मागील ९ दिवसांपूर्वी २० जुलैला त्याने रायगड येथील छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रायगड ते माउंट एव्हरेस्ट या मोहिमेला सुरुवात केली आहे. सिद्धार्थ अंधेरी येथील भवन महाविद्यालयात टी.वाय. बीएस.सी मध्ये शिक्षण घेत असून भिवंडीतील बापगाव येथील मैत्रिकुल येथे तो आपल्या मित्रांसोबत राहतो. पाच वर्षांपूर्वी त्याने माउंट एव्हरेस्ट शिखर चढण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मात्र त्यासाठी येणार आर्थिक खर्च मोठे असल्याने सिद्धार्थने मोटरसायकल , सायकल , स्केटिंग अशा सर्व पर्यायांचा विचार व अभ्यास केलामात्र त्यातही खर्च व अडचणी जास्त असल्याने सिद्धर्थने पायी प्रवास करून माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेत चालत जातांना प्रकृती बिघडू नये म्हणून फक्त घरचे जेवण व पाणी मिळावे असे आवाहन तो पायी जातांना करत असून प्रत्येक ठिकाणी थांबून एक एक झाड लावून ' एक झाड माणुसकीचा , एक पाऊल परिवर्तनाच' हा  सामाजिक संदेश देत आहे.

पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाईचे बालपण अत्यंत हलाखीत गेले आहे. सिद्धार्थ लहान असतांनाच आई वडिलांच्या घटस्फोट झाला . त्यावेळी पालन पोषणाची जबादारी वडिलांनी स्वीकारली . मात्र वाडीलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणी एक ते दोनवर्ष सिद्धार्थने मुंबईतील अंधेरी येथील एका पुलाखाली आपले बालपण काढले. त्यांनतर पोलिसांच्या मदतीने सिद्धर्थच्या आईचा शोध घेण्यात आला त्यावेळी त्याची आई केरळ येथे असल्याने सिद्धार्थचे प्राथमिक शिक्षण केरळ येथे झाले.मात्र २०११ पासून तो मुंबईत परतला. त्यांनतर मावशी व इतर नातेवाईकांनी त्याचा सांभाळ केला.

सध्या तो भिवंडीतील बापगाव येथील मैत्रीकुल येथे राहत असून विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विद्यार्थी भारती संघटनेचा सदस्य असून येथूनच त्याला माउंट एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सिद्धार्थ गणाई याने लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. विशेष म्हणजे त्याच्या या मोहिमेला कोणतीही शासकीय मदत मिळाली नसून त्याने स्वतःच पायी आपल्या स्वप्नंना गवसणी घातली आहे. सिद्धार्थ याचा नवव्या दिवसाचा प्रवास भिवंडीतून झाला. यावेळी पडघा परिसरातील युवा कवी मिलिंद जाधव यांनी त्याचे स्वागत करत एक झाड लावून त्यालापुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत, आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे देखील आपणच आहोत यासाठी मी हा एक छोटा प्रयत्न करत आहेअशी प्रतिक्रिया पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाई याने दिली आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरण