काँक्रिटीकरणामुळे वाहतूक बदल
By Admin | Updated: October 14, 2016 06:29 IST2016-10-14T06:29:22+5:302016-10-14T06:29:22+5:30
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फेटंडन रोडच्या काँक्रि टीकरणाचा पुढचा टप्पा सुरू होत असल्याने म्हाळगी चौक ते बिर्याणी चौकादरम्यानच्या वाहतुकीत बदल

काँक्रिटीकरणामुळे वाहतूक बदल
ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फेटंडन रोडच्या काँक्रि टीकरणाचा पुढचा टप्पा सुरू होत असल्याने म्हाळगी चौक ते बिर्याणी चौकादरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मानपाडा रोडवरु न नेरु रकर
मार्गे बिर्याणी चौक-डोंबिवली पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना म्हाळगी चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने म्हाळगी चौक-आर. पी. रोड, जुना आयरे रोड, आयरे पोलीस चौकी, पाटकर शाळा, राजाजी पथ, टंडन रोड, एस. के. पाटील चौकातून जातील. डोंबिवली पश्चिमेतून येणारी वाहने टंडन रस्त्यावर न येता केळकर रोड, शिवमंदिर रोडमार्गे जातील.
केळकर रोडवरु न इंदिरा चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरु राहील. केळकर रोडवरील सुभाष डेअरी व केळकर चौक (पाटणकर रस्त्यापर्यत) असलेले रिक्षा स्टँड
हटवून ते पाटणकर रोडवर जातील. केळकर रोडवरील वृंदावन हॉटेल समोरील रिक्षा स्टँड मालवीय रोडवर जाईल. टंडन रोड , डॉ. राजेंद्र प्रसाद रोड , जुना आयरे रोड, शिवमंदिर रोड, केळकर रोड, नेरु रकर रोडवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)