शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भाषांतर ही भिन्न संस्कृतींना जोडण्याची कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 1:02 AM

भाषांतर ही भाषेची तोडमोड नाही, तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे.

ठाणे : भाषांतर ही भाषेची तोडमोड नाही, तर एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडण्याची कला आहे. म्हणून, एका अर्थाने व्यापकतेकडे जाणे आहे, हे आपण समजून घ्यावे. देश स्वतंत्र झाल्यावर सर्व विद्यापीठे, प्राध्यापक, लेखक यांनी भाषांतराचे कार्य सुरू केले असते, तर आजचा भारत वेगळा असता, असे मत ज्येष्ठ प्रकाशक व लेखक रामदास भटकळ यांनी मांडले.‘वी नीड यू सोसायटी’ या संस्थेतर्फे २० वर्षे परदेशी भाषांतील साहित्य मराठीत भाषांतरित करून पाश्चिमात्य साहित्य व संस्कृतीचा परिचय करून देणाºया ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाला प्रबोधन पुरस्कार देण्यात आला. शनिवारी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. भटकळ म्हणाले की, आपल्याकडे सानेगुरु जींनी अनेक उत्तम ग्रंथ व साहित्याचा सहजसोपा अनुवाद केला आहे. यावर किमान तीन ते चार पिढ्या समृद्ध झाल्या आहेत. याच हेतूने सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाने आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र सुरू केले आहे. यात सहभागी होण्याचे प्रयत्न सर्वांनी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.अनुवाद हे कार्य केवळ तुम्हाला अन्य भाषा येतात म्हणून करता येणारे शास्त्र नाही. त्यासाठी आंतरिक इच्छा व ओढ लागते. नेमका आशय समजावा लागतो. त्यामुळे केलेल्या भाषांतराची ‘स्क्रुटिनी’ महत्त्वाची असते. यामुळे चुकीचे भाषांतर होत नाही किंवा ते सुधारणे शक्य होते. उदा. गिरीश कर्नाड यांच्या एका पुस्तकाचे भाषांतर करताना ‘कॅटरॅक्ट’ या शब्दाचे भाषांतर मोतीबिंदू केले, पण आशयानुसार ते ‘धबधबा’ असायला हवे होते. ही काळजी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. हा पुरस्कार संपादिका सुनंदा महाजन व अनघा भट यांनी स्वीकारला. त्या म्हणाल्या की, हा भाषांतराचा घाट मराठी समाज अधिक समृद्ध होण्यासाठी दिवंगत विद्यासागर महाजन यांनी घातला. वीस वर्षे तो अथकपणे सुरू आहे. वाचकांचा कायम पाठिंबा व सूचना तसेच सकारात्मक अभिप्राय आमची ताकद वाढवतो.>मान्यवरांकडून कथांचे अभिवाचन : कार्यक्र मात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी फ्रेंच कथेचे, श्रीरंग खरावकर यांनी मेक्सिकन व वासंती वर्तक या दोन्ही मान्यवरांनी एकत्रित एका जर्मन कथेचे अभिवाचन केले. ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाचा परिचय नचिकेत कुलकर्णी यांनी, ‘वी नीड यू’च्या कार्याचा परिचय संजीव साने, पुरस्काराची भूमिका जयंत कुलकर्णी व कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.