उल्हासनगरात पोलीस निरीक्षकाच्या बदल्या शेजारील कार्यालयात, बदलीबाबत चर्चेला उधाण
By सदानंद नाईक | Updated: February 2, 2024 17:13 IST2024-02-02T17:12:57+5:302024-02-02T17:13:37+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील दुसऱ्या कार्यालयात झाल्याने, बदल्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले.

उल्हासनगरात पोलीस निरीक्षकाच्या बदल्या शेजारील कार्यालयात, बदलीबाबत चर्चेला उधाण
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील दुसऱ्या कार्यालयात झाल्याने, बदल्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यांच्या जागी अन्य अधिकाऱ्यांनी नियुक्ती झाल्याने, त्यांनी मूळ पदाचा अद्यापही पदभार सोडला नाही.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांना ३ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ठाणे प्रांगणातील गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांची दोन महिन्यात ठाणे प्रांगणातील विशेष शाखा उल्हासनगर येथे बदली झाली. तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील विठ्ठलवाडी शहर वाहतूक शाखेत बदली झाली. याशिवाय मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप सावंत व सुहास आव्हाड यांची शहर वाहतूक शाखा व गुन्हे शाखा मध्ये बदली झाली. हिललाईन पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोपट करडकर यांची शहर वाहतूक शाखा उल्हासनगर येथे बदली झाली आहे. शहरातील उल्हासनगर, मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.