पालिका शाळांची वाटचाल खाजगीकरणाकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:22 IST2020-02-16T23:22:28+5:302020-02-16T23:22:41+5:30
उल्हासनगर महापालिका शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा सामाजिक

पालिका शाळांची वाटचाल खाजगीकरणाकडे?
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांना चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव पूरक सूचनेद्बारे भाजप नगरसेवकांनी महासभेत आणला आहे. उद्या होणाऱ्या महासभेत चर्चा होणार असून सत्ताधारी शिवसेनेसह मित्र पक्षाचे नगरसेवक विरोध करणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख व सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा सामाजिक, शैक्षणिक संस्थेकडे चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव भाजपच्या नगरसेविका मीना सोंडे, किशोर वनवारी, प्रदीप रामचंदानी, मनोज लासी यांनी आणला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या काही शाळा खाजगी शैक्षणिक संस्थांना चालविण्यासाठी दिल्याने गुणवत्तेसह मुलांची संख्या वाढल्याचा दावा सोंडे यांनी केला. भंगारात पडलेले गार्डन व चौकही सामाजिक संस्थांना देखरेखीसाठी दिल्यास शहराचा चेहरामोहरा बदलेल.
नगरसेवक प्रस्ताव
आणू शकतात
महासभेत प्रस्ताव आणण्याचा अधिकार नगरसेवकांचा आहे. मात्र कायदा व नियमानुसार त्याची अमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पालिका शाळा शैक्षणिक संस्थेला चालविण्यासाठी देता येत नसून ते चुकीचे होणार आहे, असे मत प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी व्यक्त केले आहे.