शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

रुळांची पाहणी करताना रेल्वे अधिकाऱ्याचा लोकलच्या धडकेत मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 18:21 IST

राय यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले

ठळक मुद्देअपघातात राय यांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान, राय यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, राय यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कल्याण रुक्मिणी बाई हॉस्पिटलमध्ये राय यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 

 

डोंबिवली - कल्याण येथील पत्री पुलानजीक रेल्वे रुळांचे पाहणी करताना विमलकुमार राय या विभागीय अभियंत्याचा रेल्वे लोकलच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. मात्र, अपघातात राय यांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, राय यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, राय यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी माहिती दिली. रुक्मिणी बाई हॉस्पिटलमध्ये राय यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 

बुधवार 31 जून रोजी 16.45 वा. चे सुमारास कल्याण पत्री पूलजवळ किमी 51.600 ते 51.700 दरम्यान अप स्लो ट्रॅक येथे कल्याण डिव्हिजनचे ADEN विमल राय 40 वर्षे ट्रॅक तपासणी करत असताना अप लोकल K 88 ही तेथे आली. सोबतचे ट्रेकमन प्रकाश बागडे यांनी त्यांना बाजूला होण्यासाठी आवाज दिला पण त्या ट्रॅकमधून बाजूला जात असताना त्यांच्या डोक्यास पाठीमागे सदर लोकल धडकल्याने ते जखमी झाल्याने fortis हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे त्यांना दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले. नंतर त्यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण येथे आणण्यात आला आहे. PSI चव्हाण व स्टाफचे मदतीने पुढील कार्यवाही करत आहोत. ADR नं.199/19 प्रमाणे दाखल करण्यात येत आहे.

ए. एस. बारटक्के,वपोनि, कल्याण रे पो ठाणे

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातkalyanकल्याण