लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३५ वाहन चालक तसेच ६३ सहप्रवाशी अशा १९८ जणांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी एकाच दिवसात कारवाई केली. आतापर्यंत ५१० मद्यपी चालक तसेच २४४ सहप्रवाशी अशा ७५४ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघाताचा नेहमीच धोका असतो. अनेकदा अशा अपघातांमध्ये चालकासह प्रवाशांचेही बळी जातात. अनेकजण जायबंदी होतात. त्याामुळे २५ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरू केली. त्यामुळेच कोरोनापासून बचाव करीत वाहन चालकांची सुरक्षित पीपीई किट परिधान करुन विशेष कार्यपद्धतीद्वारे ठाण्यात ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये ५१० मद्यपी चालकांवर कारवाई झाली. त्याचबरोबर त्यांच्यासोबत प्रवास करणाºया २४४ सह प्रवाशांवरही कारवाईचा बडगा उगारला आला.बुधवारी रात्री ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, मुंब्रा, कळवा, उल्हासनगर आदी ठिकाणी केलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान १९८ मद्य प्राशन करणारे वाहन चालक तसेच सहप्रवाशांवर कलम १८५ आणि कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली.*उल्हासनगरमध्ये सर्वाधिक कारवाईवाहतूक शाखेच्या १८ युनिटपैकी उल्हासनगरमध्ये बुधवारी सर्वाधिक १८ मद्यपी वाहनचालक आणि ९ सहप्रवासी आढळले. त्या खालोखाल नारपोली, कासारवडवली आणि कापूरबावडी या विभागांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकाच दिवसात वाहतूक पोलिसांची १३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:03 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३५ वाहन चालक तसेच ६३ सहप्रवाशी अशा १९८ जणांविरुद्ध ठाणे ...
एकाच दिवसात वाहतूक पोलिसांची १३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
ठळक मुद्दे ६३ सहप्रवाशांवरही कारवाईचा बडगासहा दिवसांत ५१० मद्यपी चालकांवर कारवाई