शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा सामना; परीक्षार्थ्यांसाठी वाहतूक पोलिस बनले ‘देवदूत’, रायडर्सने दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 01:21 IST

तर काहींना थेट वाहतूक रायडर्सच्या मदतीने परीक्षा केंद्रावर साेडविण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

ठाणे : बारावी परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या परीक्षेला जाताना ठाण्यातील परीक्षार्थ्यांना वाहतूक काेंडीला सामाेरे जावे लागले. घाेडबंदर भागात कासारवडवली, मानपाडा, कापूरबावडी, माजीवडा आणि वागळे इस्टेट परिसरात सकाळी ९:३० ते १०:३० या कालावधीत वाहतूक काेंडी हाेती. सकाळी १०:१० ते १०:३० या २० मिनिटांच्या कालावधीत काेंडी साेडविण्यासाठी वाहतूक शाखेकडे मदतीसाठी २५ पेक्षा जास्त काॅल आले. यातील अनेकांची काेंडीतून सुटका करण्यात आली. तर काहींना थेट वाहतूक रायडर्सच्या मदतीने परीक्षा केंद्रावर साेडविण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एचएससी) २०२६ च्या बारावी परीक्षेचे पेपर १० फेब्रुवारी ते १८ मार्च यादरम्यान हाेत आहे. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ या सत्रात परीक्षेचा पहिलाच पेपर हाेता. सकाळची ठाण्यातून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या वाहनांची वेळ आणि परीक्षेची वेळ साधारण एकच असल्याने ठाणे शहर वाहतूक शाखेनेही एक आठवड्यांपूर्वीच त्याचे नियाेजन केले हाेते. ठाणे शहर वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी परीक्षेच्या दिवशी वाहतूक कोंडीसह काेणत्याही कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलिस सज्ज राहणार असल्याची माहिती दिली हाेती. त्यानुसार, रस्त्यांवर ५४ रायडर्स तैनात केल्याचे सांगून ट्रॅफिक कंट्रोलसह व्हॉट्सॲप क्रमांक दिले होते.१३ काॅल्सची नाेंदपरीक्षेमुळे सकाळी ९:३० पासून परीक्षार्थ्यांची वाहने रस्त्यावर आली. घाेडबंदर मार्गावरून ठाण्यातील नाैपाडा, वागळे इस्टेट, माजीवडा, राबाेडी आदी भागातील परीक्षा केंद्रांवर जाणारी अनेक वाहने ही घाेडबंदर, माजीवडा, बाळकूम या भागात तर नाैपाड्यातून घाेडबंदरकडे जाणारी वाहनेही काेंडीत अडकली हाेती. त्यामुळे सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून ते १०:३० या २० मिनिटांत १० पेक्षा अधिक काॅल्स वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाला आले. यातील १३ काॅल्सची नाेंद झाली. संख्या वाढल्यामुळे इतर काॅल्सची नाेंदणी झाली नाही. यामध्ये बाळकूममधून तीन, माजीवडा येथून दाेन, वागळे इस्टेट राेड क्रमांक १६ येथून सहा काॅल्स नियंत्रण कक्षात आले. राेड क्रमांक १६ येथे टेम्पाे बंद पडला हाेता. ताे बाजूला करण्यात आला. इतर ठिकाणी वाहतूक सुरळीत केल्याचा दावा वाहतूक शाखेने केला. घाेडबंदर राेड आणि बाळकूम याठिकाणी वाहतूक काेंडीचा परीक्षार्थींना फटका बसल्याची माहिती या भागातील पालकांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Traffic snarls on exam day; Thane police, riders help students.

Web Summary : Traffic congestion troubled Thane's HSC students on the first exam day. Police and riders assisted stranded students, ensuring they reached exam centers on time. Thirteen calls for help were registered, mainly from Ghodbunder Road, Balkum, and Majiwada areas.
टॅग्स :Studentविद्यार्थीtraffic policeवाहतूक पोलीसHSC / 12th Exam12वी परीक्षा