शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, चालक किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 21:58 IST

Accident : कंटेनर चालक तेजप्रताप प्रजापती हा बुधवारी दमणवरुन न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघाला होता.

ठाणे: दमणवरुन घोडबंदर रोडमार्गे न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघालेला कंटेनर गायमुख जकात नाका येथील ठामपा शाळा क्रमांक ९७ जवळ उलटल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातग्रस्त कंटेनरमुळे ठाण्याकडे येणारी वाहतुकअर्धा तास खोळंबली होती. कंटेनर रस्त्याच्या बाजूला केल्यावर घोडबंदर रोडवरील वाहतुक पूर्वपदावर आली. या घटनेत कंटेनर चालकाच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

कंटेनर चालक तेजप्रताप प्रजापती हा बुधवारी दमणवरुन न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघाला होता. घोडबंदर रोडने हा कंटेनर जात असताना गायमुख जकात नाका येथे चालकाचा ताबा सुटल्याने तो उलटला. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीला चांगलाच ब्रेक बसला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथका सह कासारवडवली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या सुमारास जड आणि अवजड वाहतुक सुरू असल्याने तातडीने वाहतूक पोलिसांनी वाहतुक दुसऱ्या मार्गने वळवून रस्त्यावर उलटलेला कंटेनर क्रेनच्या मदतीने एका बाजूला केला. त्यानंतर अर्ध्या तासांनी या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. या घटनेत कंटेनर चालक प्रजापती (४३) याच्या डाव्या पायाला व डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच अपघातानंतर कंटेनरमधील सांडलेल्या तेलावरती माती पसरविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.'' या घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेत, वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविल्याने काही मिनिटांसाठी वाहतूक कोंडी झाली होती. साधारण अर्ध्या तासानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. संदीप सावंत, पोलीस निरीक्षक, कासारवडवली वाहतुक उपशाखा,ठाणे.

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसthaneठाणेTrafficवाहतूक कोंडी