टिटवाळा रेल्वे फाटकात वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:03 AM2019-12-09T01:03:42+5:302019-12-09T01:04:06+5:30

दगड वर आल्याने होतेय वाहतूककोंडी, मध्य रेल्वेची सेवा प्रभावित

Traffic congestion at Titwala railway gate | टिटवाळा रेल्वे फाटकात वाहतूककोंडी

टिटवाळा रेल्वे फाटकात वाहतूककोंडी

googlenewsNext

टिटवाळा : टिटवाळा रेल्वे फाटकातील रस्त्याची खडी व दगड वर आल्याने दुचाकी घसरून अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. तसेच या रस्त्यात अवजड वाहनांमुळे पडलेल्या उंचसखल भागांमुळे मोटारी, शाळांच्या बसही अडकून पडत असल्याने वाहतूककोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे फाटक अधिक वेळ उघडे राहत असल्याने त्याचा मध्य रेल्वेच्या सेवेवरही परिणाम होऊ लागल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टिटवाळा फाटकातून दररोज दुचाकी, मोटारी, शाळांच्या बस, रुग्णवाहिका, ट्रकसारखी अवजड वाहनांची येजा सुरू असते. मात्र, फाटकातील रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. खडी वर आल्याने दुचाकी घसरण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. तसेच फाटक ओलांडण्यास वाहनांना वेळ लागत आहे. वाहने अडकून पडत असल्याने त्याचा मोठा फटका शाळांच्या बस आणि रुग्णवाहिकांना बसत आहे. त्यामुळे या रस्त्याची रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी सोशल मीडियावरही पोस्ट व्हायरल केल्या आहेत.

शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख शिवसेना किशोर शुक्ला आणि अनिल महाजन यांनी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत रस्त्याची डागडुजी तातडीने करण्याची मागणी केली आहे. त्यावर त्यांनी रस्त्याचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, २०१७ मध्येही महाजन यांनी पाठपुरावा केल्यानंतर फाटकातील रस्ता दुरु स्त करण्यात आला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने प्रत्येकवेळी ही बाब लक्षात आणून देण्यापेक्षा स्वत: रस्त्याची दुरवस्था झाल्यावर डागडुजी करावी, त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी मांडा येथील रहिवासी गजानन मढवी यांनी केली.

रेल्वे फाटकातील रस्त्याच्या डागडुजीसंदर्भात मी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरात लवकर डांबर टाकून डागडुजी करण्यात येईल.
- दुर्गा चरण शुक्ला, टिटवाळा रेल्वेस्थानक प्रबंधक

---------------

शास्त्रीय गायन, कथ्थक नृत्याने रंगला महोत्सव
पुष्प दुसरे : पं. राम मराठे संगीत महोत्सवास रसिकांची उत्स्फूर्त दाद
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शास्त्रीय गायन आणि कथ्थक नृत्याने पं. राम मराठे संगीत समारोहाचा दुसरा दिवस रंगला. ठाणे महापालिकेच्या वतीने व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या समारोहाचे दुसरे पुष्प शनिवारी गुंफण्यात आले. या दिवसाच्या शेवटच्या सत्राचे आकर्षण ठरले ते पं. राजेंद्र गंगाणी यांचे सादरीकरण. त्यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला ठाणेकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या पं. राम मराठे संगीत समारोहाच्या दुसºया दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरु वात शास्त्रीय गायिका दीपा पराडकर-साठे यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी सुरु वातीला श्री राग सादर केला. त्यानंतर धानी राग सादर करून त्यांचे आजोबा आर.एन. पराडकर यांचा ‘ध्यास हा जीवाला, पंढरीसी जाऊ’ हा अभंग सादर केला.
यावेळी हार्मोनियमची साथ अनंत जोशी, तर तबलासाथ तेजोवृष जोशी यांनी दिली. श्रद्धा जोशी यांनी दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात कथ्थक नृत्यातून दुर्गावंदना व ठुमरी सादर केली. गत, तोडे, तत्कार, घुंगुरांचा लयबद्ध आवाज आणि तालवादकासह नृत्याच्या जुगलबंदीने त्यांनी रसिकांची मने जिंकली. तिसºया सत्राची सुरु वात यशश्री कडलासकर यांच्या यमन राग सादरीकरणाने झाली. त्यांनी भजन सादर करून या महोत्सवाची रंगत वाढविली. यावेळी हार्मोनियमची साथ अनिरु द्ध गोसावी, तबल्याची साथ रोहित मुझुमदार, तानपुºयाची साथ अंजली पटवर्धन आणि सिद्धी पटवर्धन यांनी दिली. त्यानंतर, युवा शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांनी रागेश्री राग सादर केला. त्यांनी ‘सय्या फिर याद आये’ आणि ‘का करू सजनी आये ना बालम’ ही ठुमरी सादर केली. त्यांना तबलासाथ रामकृष्ण कळंबेकर, संवादिनीसाथ सिद्धेश बिचोलकर, तानपुरासाथ ओमकार सोनवणे व जनार्दन गायकवाड यांनी दिली. शेवटच्या सत्रात पं. राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला ठाणेकर रसिकांनी चांगलीच दाद दिली. त्यांच्या कथ्थक नृत्यातील गती आणि ठहराव यांच्या विशेष शैलीतील सादरीकरणाद्वारे थेट प्रेक्षकांशी संवाद साधला गेला. त्यांना तबलासाथ दिली पं. कालिनाथ मिश्रा, सारंगीसाथ संदीप मिश्रा, बासरी डॉ. हिमांशू गिंडे तर गायनाची साथ पुष्पराज भागवत यांनी दिली.

Web Title: Traffic congestion at Titwala railway gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.