शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त चालकांमुळे वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:26 IST

पदपथांवर चढवली वाहने; डोंबिवलीत सर्वत्र फेरीवाल्यांनी केले अतिक्रमण

डोंबिवली : दिवाळीच्या तोंडावर शहरात अचानकपणे फेरीवाले वाढले असून त्यांनी जागा मिळेल तेथे पथारी पसरली आहे. पूर्वेतील फडके रोडवर शुक्रवारी सकाळपासूनच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी फडके पथवर गर्दी केली होती. पार्किंगमधील वाहनांच्या पुढे फेरीवाल्यांनी पथारी मांडल्याने फतेह अली क्रॉस रस्त्यावर फडके पथला जाताना वाहतूककोंडी झाली होती. दिवसभर ही कोंडी कायम असल्याने वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे परिसरातील रहिवाशांंमध्ये अस्वस्थता पसरली होती.

बेशिस्त वाहनचालकांनी रस्ता मिळेल तशा गाड्या पुढे काढल्याने दोन्ही दिशा जॅम झाल्या होत्या. काही केल्या वाहतूककोंडी कमी होत नव्हती. खासगी कंपन्यांच्या मोठ्या बसमुळेही या कोंडीत आणखी भर पडली. फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चाररस्ता, पारसमणी चौक ही सर्व ठिकाणे कोंडीने फुल्ल झाली होती. दुचाकी, रिक्षा, कार, टेम्पो आदींमुळे सकाळच्या वेळेत वाहनांच्या धुरामुळेही वाट काढताना नागरिकांना त्रास झाला. काही ठिकाणी सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळच वाहने अडकल्याने रहिवाशांची पंचाईत झाली होती.

डोंबिवली पश्चिमेलाही रेल्वेस्थानकाबाहेरील महात्मा गांधी रस्त्यावर सकाळच्या सुमारास वाहतूककोंडी झाली होती. स्थानकाबाहेरचा परिसर बेशिस्त रिक्षाचालकांनी बळकावल्याने कोंडीत आणखी भर पडली. या रस्त्यावर कुठेही वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घनश्याम गुप्ते रस्त्यावरही फेरीवाले वाढल्याचे पाहायला मिळाले.

वाट काढताना आले नाकीनऊ, कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिक हैराण

पूर्वेला इंदिरा गांधी चौक, चाररस्ता, रामनगर परिसर, जोशी हायस्कूल परिसर वगळता अन्य कुठेही वाहतूक पोलीस आढळले नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे विशेषत: दुचाकीचालकांचे चांगलेच फावले होते.

वाहतूककोंडीत वाहने अडकल्याने सर्व चालक कर्णकर्कश हॉर्न वाजवत होते. त्याचबरोबर अडगळीच्या ठिकाणी वाहने उभी केली जात होती. रेल्वेस्थानक परिसरात बहुतांश ठिकाणी रस्त्यांच्या पदपथांवर दुचाक्या पार्क केल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदींना मार्ग काढताना नाकीनऊ आले होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस