शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

ठाणे  जिल्ह्यात पर्यटनबंदी! जिल्हाधिकाऱ्यांच्या फर्मानाने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 04:26 IST

ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ठाणे  - एकीकडे सरकार राज्यातील नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा विचार करीत असताना पावसाळ्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यावर उपाययोजना शोधण्याऐवजी कामचुकार प्रशासनाने अशा रीतीने थेट पर्यटनावरच निर्बंध आणल्याने पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हाधिकाºयांच्या या तुघलकी फर्मानामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक व्यावसायिकांच्या पावसाळ्यातील रोजगारावरच गदा आली आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात, म्हणून त्या त्याठिकाणचे स्थानिक बेरोजगार तात्पुरते ढाबे, टेंट टाकून काकडी, चिंचा, बिस्किटे, चहा, कॉफीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात, रानभाज्या विकतात. यातून त्यांना तात्पुरता रोजगार मिळतो. शिवाय, लांबवरून आलेल्या पर्यटकांची सोयही होते. काही ठिकाणी पर्यटक मुक्कामाला येत असल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकांच्याही व्यवसायावर यामुळे गदा येणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनी जिल्हाधिकाºयांच्या या फर्मानाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून ते मागे घेण्याची मागणी केली आहे.मनाईस्थळं१ ठाणे तालुक्यातील येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपासवरील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरकिनारा२ कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, सुभेदारवाडा, गणेशघाट चौपाटी३ मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली गोरखगड, सिंगापूर नाणेघाट, धसई धरण, आंबेटेंबे४भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर.५ शहापूर तालुक्यातील भातसा धरणस्थळ, कुंडन, दहिगाव, माहुली किल्ला, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत, सापगाव नदी, कळंबे नदीकिनारा.काहींकडून स्वागत या सर्व ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांना धबधब्यावर जाणे, खोल पाण्यात उतरणे, दरीचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे, मद्य बाळगणे, मद्यधुंद होऊन प्रवेश करणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, धबधब्याच्या परिसरात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने घेऊन जाणे, ध्वनी, वायू, जलप्रदूषण करणे, अशा बाबीस प्रतिबंध केला, तो स्वागतार्ह असल्याचे काही ठाणेकरांचे मत आहे.पर्यटकांत संताप : अशा प्रकारे पर्यटनस्थळच नव्हे, तर त्यापासून एक किमीपर्यंतच्या परिघात जाण्यास मनाई करण्याऐवजी प्रशासनाने सुरक्षा यंत्रणेसह आपले कर्मचारी धांगडधिंगा करणाºया पर्यटकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना सरसकट सर्वांना तेथे जाण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत आहे....तर कल्याण-नगर मार्गच बंद होईलपर्यटनस्थळांच्या एक किमी परिघात पर्यटनबंदी म्हणजे नागरिकांनी जिल्ह्यातून कुठेच प्रवास करायचा नाही का? कारण बहुतेक पर्यटन स्थळे महामार्ग, राज्यमार्गांच्या एक किमी परिघात आहेत. माळशेज घाटातील बंदीमुळे तर कल्याण-नगर मार्गच बंद होईल.

टॅग्स :tourismपर्यटनnewsबातम्या