चाकूच्या धाकाने तरुणीवर अत्याचार
By Admin | Updated: January 1, 2017 01:46 IST2017-01-01T01:46:24+5:302017-01-01T01:46:24+5:30
गळ्याला चाकू लावून १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात अत्याचार केल्याची घटना कळव्यात घडली. या प्रकरणी परिसरातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून

चाकूच्या धाकाने तरुणीवर अत्याचार
ठाणे : गळ्याला चाकू लावून १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात अत्याचार केल्याची घटना कळव्यात घडली. या प्रकरणी परिसरातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अद्याप त्याला अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळव्यातील ही तरुणी घरकाम करणारी असून, ती शुक्रवारी दुपारी घरात एकटीच होती. दरम्यान, त्याच परिसरात राहणारा विकास कनोजिया याने तिच्या घरात शिरकाव केला, तसेच गळ्याला चाकू लावून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एल. कदम पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)