ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; आठ तासात 101.38 मिमी पावसाची नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 18:30 IST2020-07-07T18:29:36+5:302020-07-07T18:30:26+5:30

ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसाने सोमवारी काहीकाळ विश्रांती घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळ पासून पुन्हा दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील पाचपाखाडी भागातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले.

Torrential rains with strong winds in Thane; 101.38 mm of rainfall recorded in eight hours | ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; आठ तासात 101.38 मिमी पावसाची नोंद 

ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; आठ तासात 101.38 मिमी पावसाची नोंद 

ठाणे : ठाणे शहरात सोमवारी दुपार नानात्र विश्रांती घेतलेल्या पावसाने, मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली. या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरांचीही पडझड, झाडे उन्मळून पडल्याने चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात मागील आठ तासात 101.83 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


    ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसाने सोमवारी काहीकाळ विश्रांती घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळ पासून पुन्हा दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील पाचपाखाडी भागातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. तर, वसंत विहार, महागिरी कोळीवाडा आणि चिरागनगर भागात झाडे उन्मळून पडल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. वसंत विहार आणि मुंब्रा आग्निशमन केंद्र येथे झाड्याच्या फांद्या उन्मळून पडल्याने चार वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच यशोधन नगर येथे इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर झाडे उन्मळून पडल्यामुळे पाच दुचाकींचे नुकसान झाले आहे. संपुर्ण शहरात वृक्ष कोसळणे, झाडांच्या फांद्या तुटुन पडणे, भिंत कोसळणे अशा 20 घटना घडल्या. तर,  शहरातील नेहमी पाणी तुंबण्याचे ठिकाण असलेल्या वंदना सिनेमागृह परिसरात पहिल्यांदाच पाणी साठले नसल्याचे दिसून आले.

तर, माजिवाडा, कोर्ट नाका, जांभळी नाका, शिवाजीनगर, आनंदनगर, ठाणे महापालिका कार्यालया जवळील परिसर, वंदना सिनेमागृह, कापुरबावडी, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, मुलुंड चेक नाका भागात पाणी साचले होते. तर, शहरात मेट्रोची कामे सुरु असलेल्या तीनहात नाका परिसराही पाणी तुंबले होते. म्नाग्ल्वारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मागील आठ तासात 101.38 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर, मागील 24 तासात 30.18 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 


     दरम्यान, शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या ठाणे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या नगर भूमापन अधिकारी कार्यालयात पाणी भरले असुन रेकॉर्ड खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Torrential rains with strong winds in Thane; 101.38 mm of rainfall recorded in eight hours

टॅग्स :Rainपाऊस