स्वच्छतागृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST2021-03-20T04:40:05+5:302021-03-20T04:40:05+5:30

--------------- ऑर्केस्ट्रा बारच्या गायकाला मारहाण उल्हासनगर : कॅम्प नं. ४ परिसरातील राखी ऑर्केस्ट्रामधील गायक सनी गिरी हा बुधवारी रात्री ...

Toilet condition | स्वच्छतागृहाची दुरवस्था

स्वच्छतागृहाची दुरवस्था

---------------

ऑर्केस्ट्रा बारच्या गायकाला मारहाण

उल्हासनगर : कॅम्प नं. ४ परिसरातील राखी ऑर्केस्ट्रामधील गायक सनी गिरी हा बुधवारी रात्री साडेदहा वाजता पगाराचे पैसे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी बार व्यवस्थापक कृष्णा नाईक याने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

------------------

क्रेनच्या बॅटरीची चोरी

उल्हासनगर : उसाटणे गावाच्या हद्दीत फेंट व्हिंगस कंपनीच्या तारेचे कुंपण तोडून चोरट्याने क्रेनच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्या. चोरीचा हा प्रकार १३ व १४ मार्चच्या रात्रीत घडला असून, याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------

एलईडी दिवे

उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तक्षशीला शाळा रस्त्यावर एलईडी दिवे लावण्यात येत आहे. नगरसेविका कविता बागुल यांच्या प्रयत्नातून हे दिवे लावण्यात येत असल्याची माहिती समाजसेवक सुधीर बागुल यांनी दिली.

Web Title: Toilet condition