आज महाडमध्ये लोटणार भीमसागर
By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:37+5:302016-03-20T02:13:37+5:30
जातीपातीच्या शृंखलांतून दलितांची मुक्ती व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले.

आज महाडमध्ये लोटणार भीमसागर
महाड : जातीपातीच्या शृंखलांतून दलितांची मुक्ती व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक घटनेचा ८९वा वर्धापन दिन रविवारी महाडमध्ये साजरा करण्यात येत असून, यानिमित्त भीमसागर लोटणार आहे. यासाठी शनिवारपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंबेडकर अनुयायी महाडमध्ये दाखल झालेले आहेत. यानिमित्त खा. रामदास आठवले, अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, अॅड. आनंदराज आंबेडकर यांच्यासह आ. वारीस पठाण, आ. इम्तियाज जलील उपस्थित राहून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत.