टीएमटीचे खाजगीकरण करण्याचा इशारा

By Admin | Updated: November 18, 2016 03:14 IST2016-11-18T03:14:51+5:302016-11-18T03:14:51+5:30

वारंवार सूचना आणि आदेश देऊनही ठाणे परिवहन सेवेमध्ये सुधारणा न झाल्यास परि

TMT privatization alert | टीएमटीचे खाजगीकरण करण्याचा इशारा

टीएमटीचे खाजगीकरण करण्याचा इशारा

ठाणे : वारंवार सूचना आणि आदेश देऊनही ठाणे परिवहन सेवेमध्ये सुधारणा न झाल्यास परिवहन सेवेचे खाजगीकरण करणार असल्याचा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. तसेच जानेवारी महिन्यानंतर परिवहन सेवेला संचालनातील तूट भरून काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत फेरविचार करण्यात येईल, असेही त्यांनी गुरुवारच्या बैठकीत स्पष्ट केले.
परिवहन सेवेचा कारभार अद्यापही सुधारत नसल्याचे वृत्त गुरुवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन आयुक्तांनी बैठक घेतली. टीएमटीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून उर्वरित दोन महिन्यांत काम न सुधारल्यास परिवहन सेवेच्या खाजगीकरणाचाही विचार करण्यात येईल, असा इशारा दिला. जानेवारीपर्यंत सुधारणा झाली नाही, तर परिवहनला देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत फेरविचार करण्यात येईल, असेही सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: TMT privatization alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.