शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

‘जीपीएस’ सांगणार टीएमटीचा ठावठिकाणा; ५० बसथांब्यांंवर मिळणार डिजिटल डिस्प्लेची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:57 PM

ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३५० हून अधिक बस आहेत.

ठाणे : टीएमटीच्या प्रवाशांना बसची स्थिती दर्शविणारा ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ हे अ‍ॅप अखेर दोन वर्षांनंतर कार्यरत झाले आहे. प्रवाशांना बसथांब्यावर आल्यानंतर आपल्या मार्गावर जाणारी बस कुठे आणि केव्हा येणार आहे, याची अचूक माहिती देणारे, वेळ दर्शविणारे एलईडी डिस्पले ९८ मार्गांवरील प्रमुख ५० बसथांब्यांवर कार्यरत झाले आहेत. विशेष म्हणजे परिवहनने आता २५० पेक्षा अधिक बसवर जीपीएस प्रणालीही कार्यरत केल्याने कुठली बस कुठे आहे, याचा अचूक अंदाज कार्यालयात बसून अधिकाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांनाही यामुळे चाप बसणार आहे.ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३५० हून अधिक बस आहेत. त्यातील २५० च्या आसपास रस्त्यावर धावत आहेत. या २५० बसवर जीपीएस प्रणाली कार्यरत केली आहे. यामुळे कोणती बस कोणत्या मार्गावर आहे, वाहतूककोंडीत अडकली आहे का? शेवटच्या ठिकाणावर जाऊन किती वेळ थांबली, याची सर्वच माहिती परिवहनच्या अधिकाºयांना कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूमवर तत्काळ उपलब्ध होणार आहे. तसेच प्रत्येक बसने दिवसभरात किती फेºया मारल्या, किती चुकविल्या का? याचीही अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाºयांना अंकुश बसणार आहे.दोन वर्षे करावी लागली प्रतीक्षाप्रवाशांना बसची सेवा अधिक सुलभपणे देता यावी, यासाठी ठाणे परिवहनसेवेने प्रवाशांसाठी ‘व्हेअर इज माय टीएमटी बस’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून ते असून नसल्यासारखे होते. परंतु, आता ते खºया अर्थाने कार्यरत झाले आहे. ठाणे परिवहनचे ४५० बसथांबे, त्यातील ९८ मार्गांवरील प्रमुख ५० बसथांब्यांवर परिवहनमार्फत डिजिटल डिस्प्ले लावले आहेत. तसेच यावरच एक क्यूआर कोडही दिला आहे. यावर सर्च केल्यानंतर परिवहनचे अ‍ॅप प्रवाशांना मोबाइलमध्ये डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे आपण ज्या बसथांब्यावर उभे आहोत, त्याठिकाणी आपल्याला ज्या गंतव्य ठिकाणी जायचे आहे, त्या बसची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे बस लवकर गेली किंवा तिला उशीर झाला तरी, त्याची माहिती या डिस्प्लेवर दिसणार आहे. जोपर्यंत ती बस बसथाब्यांवरून पुढे जात नाही, तोपर्यंत ती डिस्प्लेवर दिसणार आहे. यामुळे प्रवाशांनादेखील याचा फायदा होणार आहे. तसेच जीपीएसमुळे हे सर्व एकत्रित कनेक्ट करण्यात आल्याने बसची अचूक माहिती उपलब्धहोणार आहे.भविष्यात तिकिटासह पासही आॅनलाइनभविष्यात बसचे तिकीट, पासदेखील आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. ठाणे परिवहनच्या नीळकंठ येथील आगारामध्ये या आॅनलाइन सेवेचे कंट्रोल सुरू केले आहे. प्रवाशांनी हे अ‍ॅप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून घेतल्यास शहरातील परिवहनच्या सर्व बसची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.टीएमटीने सुरू केलेले अ‍ॅप आता खºया अर्थाने वेग घेणार आहे. बसला लावलेल्या जीपीएसचा फायदादेखील प्रवाशांना होणार आहे. तसेच प्रत्येक बसवर आणि त्यावरील वाहक आणि चालकांवरही नियंत्रण ठेवणे आता यामुळे सोपे झाले आहे.- संदीप माळवी,व्यवस्थापक, टीएमटी

टॅग्स :thanjavur-pcतंजावूर