शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

टीएमटीची भाजपाला धडक, शिवसेनेचा दणदणीत विजय, दोघे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:50 AM

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एम्प्लॉईज युनियनसाठी १२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धर्मवीर पॅनेलने बाजी मारली.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एम्प्लॉईज युनियनसाठी १२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धर्मवीर पॅनेलने बाजी मारली. सर्वच्या सर्व ३७ उमेदवार निवडून आल्याने विरोधकांची धूळधाण उडाली. यंदा या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या भाजपाने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येत होते. कामगारांना नोकरीत कायम करण्याचे आश्वासन थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळवूनही त्या पक्षाला सपाटून मार खावा लागला.एव्हढेच नव्हे, तर शरद रावप्रणित युनियनलाच्या प्रगती पॅनेललाही कामगारांनी पसंती दिली नाही आणि शिवसेनेच्या हाती सरसकट सत्ता दिली. या निवडणुकीत दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.ठाणे परिवहन सेवेच्या एम्प्लॉईज युनियनच्या ३७ जागांसाठी शनिवारी शांततेत मतदान प्रक्रि या पार पडली. १,८८९ मतदारांपैकी १,७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९३.५० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपाने पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे दाखवून दिले. आमदार संजय केळकर यांच्यासह वेगवेगळे पदाधिकारी उतरले होते. शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न केला. आगारापासून कामगारांच्या प्रश्नांपर्यंत अनेक आश्वासने देण्यात आली. त्यामुळे व्यवस्थेच्या दृष्टीने खिळखिळी झालेली टीएमटी निवडणुकीच्या टॉनिकने मात्र ताजीतवानी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाच्या या हालचालींमुळे प्रथमच शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्या पक्षाचेही नेते पूर्ण ताकद लावत निवडणुकीत उतरले. एकंदरीतच या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत गेली. भाजपाने ३७ पैकी ३० , शिवसेनेने ३७ तसेच शरद रावप्रणित संघटनेच्या प्रगती पॅनलचे २२ उमेदवार रिंगणात उतरले होते .मतदान पार पडल्यावर शनिवारी सायंकाळी लगेचच मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून धर्मवीर पॅनलने घेतलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. मध्यरात्री एकच्या सुमारास निकाल हाती आला आणि शिवसेनेने एकहाती गड राखल्याचे स्पष्ट झाले.धर्मवीर पॅनलचे दोघे बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी निवड झालेल्या गणेश देशमुख यांना ८१७, उपाध्यक्षपदाचे गोविंद सूर्यवंशी यांना ८१६ आणि दुसरे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांना ८३१, सरचिटणीस सुनील म्हामुणकर यांना ९२१, कार्यचिटणीस विजय बाम्हणे ८९७, चिटणीस विलास निकम ९०२ आणि खजिनदारपदी निवड झालेल्या मनोहर जांगळे यांना ७९८ मते मिळाली. विश्वास टिकवला : टीएमटीसमोर अडचणीचा डोंगर आहे. सेवा पंक्चर झाल्याची टीका सुरू आहे. कामगारांचेही प्रश्न सोडवण्याची गरज आहे. या स्थितीत टीएमटी शिवसेनेच्या हातातून जाईल, असा विरोधकांचा दावा होता. पण या स्थितीतही कामगारांचा विश्वास कायम ठेवण्यात शिवसेना यशस्वी झाली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना