शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

ठामपाचे उत्पन्नाचे स्राेत आटले, कोरोनामुळे बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 03:17 IST

TMC Budget : ठाणे महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर व फी पासून २०२०-२१ मध्ये ७७३ कोटी २६ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, डिसेंबर २०२० पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न पाहता मालमत्ताकरापासून उत्पन्न ६०९ कोटी ५४ लक्ष सुधारित केले आहे.

ठाणे  -  महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत मालमत्ता कर व फी पासून २०२०-२१ मध्ये ७७३ कोटी २६ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु, डिसेंबर २०२० पर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न पाहता मालमत्ताकरापासून उत्पन्न ६०९ कोटी ५४ लक्ष सुधारित केले आहे. २०२१-२२ मध्ये मालमत्ताकर व फीसह ६९३ कोटी २४ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे.विकास व तत्सम शुल्क २०२०-२१ मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी ९८४ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. लॉकडाऊनचा फटका हा सर्वात जास्त रिअल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. स्वगावी गेलेले मजूर, लोकांच्या उत्पन्नात आलेली घट याचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाल्यामुळे पर्यायाने महापालिकेच्या उत्पन्नात भरून येणारी तूट आली आहे. यामुळेच शहर विकास विभागाकडील उत्पन्न ९८४ कोटी वरून २६० कोटी सुधारित केले आहे. शहर विकास विभागास या मंदीचा फटका पुढील वर्षी सुद्धा बसण्याची शक्यता असल्याने २०२१- २२ मध्ये ३४२ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.स्थानिक संस्थाकर विभागाकडे वस्तू व सेवाकर अनुदानापोटी ८४० कोटी मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान २२० कोटी, स्थानिक संस्था कर व जकातीची मागील वसुली ४६ कोटी असे एकूण एक हजार १०६ कोटी अपेक्षित होते. शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत आहे. परंतु, मुद्रांक शुल्क अधिभारापोटी मिळणारे अनुदान ऑक्टोबर २०१९ पासून प्राप्त झालेले नाही. मार्च २०२१ पर्यंत १५० कोटी अपेक्षित केले आहे. स्थानिक संस्था कराच्या मागील थकबाकीचे असेसमेंट सुरू आहे. परंतु, अपेक्षित केलेले ४० कोटी प्राप्त होणे अशक्य आहे. यामुळेच या सर्व बाबींचा विचार करून एकूण एक हजार कोटी एक लक्ष उत्पन्न सुधारित केले असून २०२१-२२ साठी एक हजार १५२ कोटी ७० लक्ष उत्पन्न अपेक्षित धरले आहे.२०२१-२२ मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून २१ कोटी ०५ लक्ष उत्पन्न अपेक्षित धरले आहे. जाहिरात फी पोटी २०२०-२१ मध्ये ४० कोटी ३७ लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे. ते १० कोटी ८४ लक्ष सुधारित केले असून २०२१-२२ मध्ये २२ कोटी ३७ लक्ष अंदाजित केले आहेत.क्रीडाप्रेक्षागृह, नाट्यगृह, तरणतलाव विभाग लॉकडाऊनमुळे बंद असल्याने अल्पसे उत्पन्न प्राप्त होणार असल्याने सुधारित अंदाजपत्रकात उत्पन्नाचे उद्दिष्ट कमी केले आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोविडच्या रुग्णांवर मोफत उपचार केल्यामुळे रुग्ण फी कमी प्रमाणात जमा झाली आहे.  पाणीपुरवठा विभागाकडून २०० कोटींचे उत्पन्न पाणीपुरवठा आकारासाठी २०२०-२१ मध्ये २२५ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. यामध्ये मीटरद्वारे व ठोक दराने पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ सुचविली होती. ती नामंजूर झाल्याने पाणीपुरवठा आकारापोटी १६० कोटी उत्पन्न सुधारित अंदाजपत्रकात अपेक्षित केले असून २०२१-२२ मध्ये २०० कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.अग्निशमन दल- अग्निशमन विभागातदेखील शहर विकास विभागाप्रमाणे उत्पन्नात मोठी तूट झालेली असून मूळ अंदाज १०० कोटी वरून ४८ कोटी ३७ लक्षांचा सुधारित अंदाज प्रस्तावित केला. तर २०२१-२२ मध्ये ९८ कोटी २६ लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून ५० कोटी वरून १४ कोटी ८८ लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेBudgetअर्थसंकल्प