ठाणे स्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट; तीन वर्षांत ८६ आरोपी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:07 AM2020-01-17T00:07:12+5:302020-01-17T06:43:48+5:30

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून लोंढेच्या लोंढे येताना दिसत आहेत. ते मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात येऊन वास्तव्यात राहत आहेत.

Ticket brokers rally in Thane station; Three accused were arrested in three years | ठाणे स्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट; तीन वर्षांत ८६ आरोपी पकडले

ठाणे स्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट; तीन वर्षांत ८६ आरोपी पकडले

Next

ठाणे : ठाणेरेल्वेस्थानकात परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांना कन्फ र्म तिकीट देण्याचे आमिष दाखवून लुटणाºया ८६ दलालांना मागील तीन वर्षांत ठाणे रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) जेरबंद केले आहे. या आकडेवारीवरून ठाणे रेल्वेस्थानकात तिकीट दलालांचा सुळसुळाट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, तीन वर्षांत केलेल्या कारवाईमुळे आता ठाण्यात एकही तिकीट दलाल नसल्याचा दावा ठाणे आरपीएफने केला आहे. तसेच बिहारमधील प्रवाशांना या तिकीट दलालांनी सर्वाधिक लुटल्याचे दिसून आले आहे.

नोकरीधंद्यांसाठी बºयाच राज्यांतून स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांपासून लोंढेच्या लोंढे येताना दिसत आहेत. ते मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात येऊन वास्तव्यात राहत आहेत. त्यामुळे मुंबईतून बाहेरगावी येजा करणाºया गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्या गाडीचे कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांना लक्ष्य करून हे दलाल त्यांना कन्फर्म तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुटतात. ठाणे रेल्वेस्थानकात मागील तीन वर्षांत अशा ८० घटना समोर आल्या आहे. या घटनांमध्ये ८३ जणांना जेरबंद केले आहे. ही कारवाई ठाणे आरपीएफने केली आहे. यामध्ये २०१७ मध्ये १४ घटनांमध्ये १४ जणांना पकडले आहे. त्यानंतर, २०१८ मध्ये या घटनांत वाढ होऊन ती संख्या ३९ वर गेली आहे. त्या घटनांमध्ये ४० जणांना पकडले आहे. मात्र, २०१९ मध्ये हे प्रमाण पुन्हा कमी करण्यात ठाणे आरपीएफला यश आले आहे. या वर्षभरात २७ घटनांमध्ये ३२ जणांना पकडले. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाते.

दलालांना बसला ब्रेक
बिहार राज्यात येजा करणाºया बºयाच गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिकडील प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे ते कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी पैसे मोजण्यास तयार असतात. ही बाब लक्षात घेऊन ही मंडळी अव्वाच्या सव्वा पैसे सांगून त्यांना लुटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार होणाºया कारवायांमुळे सद्य:स्थितीत ठाण्यात दलालांना आता ब्रेक बसला असून त्यांची रेल्वे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी नसल्याचा दावा आरपीएफने केला आहे.

Web Title: Ticket brokers rally in Thane station; Three accused were arrested in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.