शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

चोरटी रेती वाहतूक करणारा डंपर पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 8:34 PM

महसूल विभागाने चोरटी रेती वाहतूक करणारा डंपर पकडला असून, या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा रोड - महसूल विभागाने चोरटी रेती वाहतूक करणारा डंपर पकडला असून, या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदरचे रेती बंदर, वरसावे आदी भागातून चोरटी वाळूची वाहतूक केली जाते. शिवाय भाईंदरच्या उत्तन व पाली समुद्रकिनारी देखील सर्रास बेकायदेशीरपणे वाळूची तस्करी केली जाते. या प्रकरणी सातत्याने तक्रारी होत असतात. उत्तन - पाली भागात तर वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून, तेथे सर्रास संबंधित यंत्रणा डोळेझाक करतात.दरम्यान काल मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी घोडबंदरच्या सगणाई देवी मंदिर जवळच्या नाक्यावर मंडळ अधिकारी दीपक अनारे व तलाठी अभिजीत बोडके यांनी पाळत ठेवली असता वाळूची वाहतूक करणारा डंपर एमएच ४७ वाय २४१७ हा थांबवला. चालकाकडे वाळू वाहतुकीची रॉयल्टी विचारली असता त्याने मुदतबाह्य २९ डिसेंबर रोजीची रॉयल्टीची पावती दाखवली. अधिका-यांनी विनापरवाना वाळूची वाहतूकप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात डंपर व चालकास नेत असताना चालक डंपर सोडून पळून गेला. डंपरमध्ये चोरटी दोन ब्रास वजनाची वाळू असून त्याची किंमत १ लाख ६०० रुपये इतकी आहे. बोडके यांच्या फिर्यादीनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.