देहविक्री व्यवसायातून तिघींची सुटका, दलाली करणा-या घरमालकिणीला आणि २५ वर्षांच्या तरुणीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:00 IST2017-11-15T00:59:37+5:302017-11-15T01:00:02+5:30

देहविक्री व्यवसायातून तिघींची सुटका, दलाली करणा-या घरमालकिणीला आणि २५ वर्षांच्या तरुणीला अटक
डोंबिवली : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या ठाणे पोलिसांनी सोमवारी डोंबिवलीत पूर्वेकडील डीएनसी हायस्कूल परिसरातील एका इमारतीत चाललेला देहविक्र ीचा व्यवसाय उघडकीस आणला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात २२ ते २५ वयोगटांतील तिघा तरु णींची सुटका करण्यात आली.
याप्रकरणी दलाली करणा-या २५ वर्षांच्या तरु णीला आणि ३० वर्षांच्या घरमालकिणीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींना दीड हजार रुपये या व्यवसायातून मिळत असत. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.