शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये रस्ता खचल्याने तीन वाहने २० फूट खड्डयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 8:20 PM

वर्तकनगर येथील एका इमारतीच्या पायाभरणी खोदकामाला लागूनच असलेला रस्ता मोठया प्रमाणात खचल्यामुळे या भागातील तीन वाहने २० फूट खोल खड्डयात कोसळली.

ठळक मुद्देपाया भरणी खोदकामाच्या लगताचा रस्तापावसामुळे खचला रस्त्यालगताचा भागसुदैवाने जिवीत हानी टळली

ठाणे: एका खासगी विकासकाच्या चुकीमुळे वर्तकनगर इमारत क्रमांक ६१ च्या बाजूला असलेला रस्ता शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक खचला. त्यामुळे दोन रिक्षांसह एक मिनी स्कूल बस २० फूट खोल खड्डयात कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.वर्तकनगर इमारत क्रमांक ६१ च्या बाजूलाच एम. एस. बिल्डर यांच्या वतीने इमारत बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मलगे या विकासकाने तिथे पाया उभारणीसाठी २५ फूट खोल खड्डाही केला आहे. बांधकामाला लागूनच याठिकाणी पत्रेही लावलेले आहेत. जवळच असलेल्या गटाराला लागूनच पाया उभारणीचा हा खड्डा ऐन पावसाळयात केल्याने शनिवारी सकाळी गटाराच्या बाजूचा पूर्ण रस्ता खचला. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या दोन रिक्षा आणि एक मिनी स्कूल बसही या २० फूट खोल खड्डयात कोसळल्या. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने ही वाहने खड्डयातून बाहेर काढली. दरम्यान, संबंधित विकासकावर कारवाई करण्याची तसेच पावसाळयात खोदकाम न करण्याची मागणी मनसेचे वर्तकनगर शाखा अध्यक्ष संतोष निकम यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे.‘‘या विकासकाने पावसाळयापूर्वीच इमारतीच्या पाया भरणीचे खोदकाम करणे आवश्यक होते. ऐन पावसाळयात त्याने हे काम सुरुच ठेवले. शिवाय, गटाराला लागून असलेल्या भागावरही खोदकाम झाले. त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. पावसाळयात पालिकेने अशा खोदकामांना परवानगी देऊ नये अशी मागणी पालिकेकडे करणार आहे.’’संतोष कदम, शाखाअध्यक्ष, वर्तकनगर, महाराष्टÑ नवमिर्माण सेना.

टॅग्स :thaneठाणेMumbai Rainमुंबईचा पाऊसAccidentअपघात