शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

जिल्ह्यातील आरटीईच्या तीन हजार ९५७ बालकांचे पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 7:41 PM

आरटीईव्दारे जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवलेले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. त्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गातील १३ हजार ४०० बालकांची या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी निवड झाली आहे. यातून पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली.

ठळक मुद्दे ६५२ शाळांमध्ये पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेशपहिल्या सोडतमधील या बालकांचे निश्चित झालेले प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले २० मेनंतर होणा-या दुस-या फेरीत प्रवेश

ठाणे : ‘शिक्षणाचा हक्क’ (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील अनुदानीत, विना अनुदानतीत, स्वयंअर्थसहाय्य आदी उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या ६५२ शाळांमध्ये पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी पहिल्या फेरित तीन हजार ९५७ बालकांचा प्रवेश निश्चित झाला. उर्वरित विद्यार्थ्यांना २० मेनंतर होणा-या दुस-या फेरीत प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे.आरटीईव्दारे जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवलेले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले होते. त्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गातील १३ हजार ४०० बालकांची या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी निवड झाली आहे. यातून पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली. यातील चार हजार ६२० विद्यार्थी - विद्यार्थिनींची पहिलीच्या वर्गासाठी झाली होती. यातून तीन हजार १९० बालकांचे आता पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले. उर्वरित २४ बालकांचे प्रवेश अर्ज विविध कागदपत्रांच्या उपलब्धते अभावी रद्द झाले. तर एक हजार ४०५ बालकांचे संबंधीत पालक दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलेच नाही.या पहिलीच्या वर्गातील प्रवेशाप्रमाणेच पूर्व प्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गातील प्रवेशासाठी एक हजार २७६ विद्यार्थी - विद्यार्थिनींची पहिल्या फेरीत निवड झाली होती. त्यातून ७६७ बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळांवर निश्चित झाले. नवी मुंबईतील तीन आणि ठाणे येथील दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले. उर्वरित ५०२ बालकांचे वडील दिलेल्या शाळांवर जावून बालकांचे प्रवेश घेऊ शकले नसल्याचे निदर्शनात आले. यामध्ये मीरा भार्इंदर मनपा क्षेत्रातील २२१, ठाणे मनपा क्षेत्रातील १०३ विद्यार्थी, ठाणे मनपा १ मधील ६५, अंबरनाथ ५२, भिवंडी मनपातील २६, कल्याण ग्रामीण ११, कल्याण शहर २ , उल्हासनगर १२ आणि शहापूर येथील दहा विद्यार्थ्यांचे पालक दिलेल्या शाळांवर प्रवेशासाठी गेले नाही. यामुळे या बालकांचे प्रवेश रखडले आहेत.पहिल्या सोडतमधील या बालकांचे निश्चित झालेले प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले आहेत. यानंतर दुसºया सोडतमध्ये १ ते तीन किमी.च्या अंतरावरील शाळांमधील प्रवेशासाठी बालकांची निवड होणार आहे. या दुसºया सोडतीमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतरही विद्यार्थी शिल्लक राहिल्यास तीन किमी. पेक्षा अधीक लांबच्या शाळांमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. झाली आहे. जिल्ह्याभरात ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात होणार आहेत. त्यापैकी पहिल्या सोडतव्दारे तीन हजार १९० बालकांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश झाल आहेत.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद