शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तीन चोरट्यांना अटक, सव्वा तीन लाखांचे मोबाईल लॅपटॉप केले जप्त

By नितीन पंडित | Updated: May 19, 2024 19:15 IST

भिवंडीत गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी: शहरात वाढत असलेल्या मोबाईल चोरी सोबतच घरपोडीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने विशेष पथकामार्फत कारवाईचे आदेश दिल्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेने तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या जवळून मोबाईल व लॅपटॉप असा तीन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

भिवंडी परिमंडळ दोन परिक्षेत्रा मधील घरफोडी, मोबाईल चोरीच्या गुन्हयांचे तपासाबाबत विशेष पथक तयार करून गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिल्या नंतर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,धनराज केदार,पोलिस कर्मचारी अमोल देसाई,प्रकाश पाटील, देवानंद पाटील,किशोर थोरात,सचिन जाधव,अमोल इंगळे,उमेश ठाकुर,भावेश घरत,सचिन सोनावणे,नितीन बैसाणे हे तपास करीत असताना अमोल इंगळे यांना घरफोडी चोरी मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या चोरट्यां बद्दल माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी कैफ इसरार सिद्धीकी,वय १९ वर्षे,रा.पटेल कंपाऊंड, धामणकर नाका,अंकीत तेजाराम गुप्ता,वय १९ वर्षे,रा. शांतीनगर या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्या जवळून भिवंडी शहर व निजामपूर पोलिस ठाणे हद्दीतून चोरलेले पाच मोबाईल व यंत्रमाग कारखान्यात घरफोडी केलेल्या गुन्ह्यातील १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .या दोघा आरोपींचा एक साथीदार लाला उर्फ साहेल याचा पोलिस शोध घेत आहेत.

तर दुसऱ्या एका गुन्ह्याचा समांतर तपस करीत असताना पोलिस शिपाई उमेश ठाकुर यांना गुप्त बातमीदार मार्फत एका आरोपींची माहिती मिळाली.त्यानुसार  मोहम्मद सैफ जावेद खान,रा. रावजीनगर, कल्याण रोड यास ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता तेथून भिवंडी शहर व शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेला एक लॅपटॉप व ५ मोबाईल असा १ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या दोन्ही कारवाईत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी