शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

मुंब्रा येथे तीन दुकानांना आग; तासाभराने आगीवर नियंत्रण 

By अजित मांडके | Published: April 26, 2024 10:30 AM

मुंब्रा-पनवेल रोड लगत असलेल्या तीन दुकानांना सकाळी 08 वाजण्याच्या दरम्यान आग लागली असल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली.

ठाणे : मुंब्रा-शीळफाटा येथील मुंब्रा-पनवेल रोडवर असलेल्या बाजूबाजूच्या तीन दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग तासाभरात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी मेडिकल, डेकोरेट आणि चिकन शॉप या तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

मुंब्रा-पनवेल रोड लगत असलेल्या तीन दुकानांना सकाळी 08 वाजण्याच्या दरम्यान आग लागली असल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेल्या त्या आगीवर नऊ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत मेडिकल दुकानातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, बारकोड मशीन,  फ्रिजर, पंखे, औषधांचा साठा व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे. 

डेकोरेट क्लॉथेज कॅटलॉक, लाकडी सोफा सेट, शिलाई मशीन, पंखा, सॅम्पलसाठी ठेवण्यात आलेला कपडा व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे. तसेच चिकन दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग व साठा करून ठेलेला भुसा किरकोळ जळाला आहे. यावेळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह, ०१-हायराईज फायर वाहन पाचारण केले होते. तर, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :mumbraमुंब्राfireआग