घर वापसी झालेल्या तिघा वरीष्ठ निरीक्षकांची पूर्वीच्या पोलीस ठाण्यातच पुनर्स्थापना
By धीरज परब | Updated: January 13, 2025 23:02 IST2025-01-13T23:02:58+5:302025-01-13T23:02:58+5:30
१० पोलीस ठाण्याचे प्रभारी अखेर वपोनि म्हणून कायम

घर वापसी झालेल्या तिघा वरीष्ठ निरीक्षकांची पूर्वीच्या पोलीस ठाण्यातच पुनर्स्थापना
धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकां पैकी संजय हजारे यांची मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून तर जितेंद्र वनकोटी यांची पेल्हार आणि राजेंद्र कांबळे यांची काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती केली गेली आहे . तर तेथील पोलीस निरीक्षकांची अन्य पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून उर्वरित १० पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना त्याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कायम केले आहे .
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या आदेशा नुसार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या . मात्र त्या बदल्या अन्यायकारक आणि चुकीच्या असल्याचा दावा करत अनेक पोलीस निरीक्षक मॅट मध्ये गेले होते .
निवडणुकीत मुंबई आदी भागातुन बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकांची पोलीस ठाण्यात नियुक्ती करताना ती तात्पुरती म्हणून केले गेली होतीच शिवाय पोलीस ठाणे प्रभारी म्हणून देखील उल्लेख केला नव्हता . केवळ तुळींज पोलीस ठाण्यात प्रमोद तावडे यांची वपोनि म्हणून नियुक्ती होती . अश्या प्रकारच्या आदेशाची चर्चा देखील रंगली . परंतु सेवा ज्येष्ठते प्रमाणे पोलीस निरीक्षकांनी पदभार घेतला .
दरम्यान मिभा - ववी आयुक्तयातून बदली केलेल्यां पैकी संजय हजारे , जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे , चंद्रकांत सरोदे , विलास सुपे , दिलीप राख व सुधीर गवळी ह्या ७ पोलीस निरीक्षकांची ३१ डिसेम्बर रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने पुन्हा घरवापसी केली होती . ९ जानेवारी रोजी हे सर्व ७ अधिकारी पोलीस आयुक्तालयात हजर झाले होते .
संजय हजारे , जितेंद्र वनकोटी व राजेंद्र कांबळे यांची अपेक्षेप्रमाणे पूर्वीच्या पोलीस ठाण्यात वपोनि म्हणून नियुक्ती केली गेली आहे . विलास सुपे यांना आर्थिक गुन्हे शाखेत तर चंद्रकांत सरोदे यांना नियंत्रण कक्षात वपोनि म्हणून नेमले आहे .
काशीमीरा पोलीस ठाण्याचे प्रभारी लालू तुरे यांना विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तर मांडवी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रकाश कावळे यांना बोळींज वपोनि म्हणून नेमले आहे . अमली पदार्थ विरोधी शाखेचे अमर मराठे यांना आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून बदलले आहे .
तर मीरारोड पोलीस ठाण्याच्या मेघना बुरांडे , काशीगावचे महेश तोगरवाड , नया नगरचे अमर जगदाळे, उत्तनचे शिवाजी नाईक , नायगावचे विजय कदम , माणिकपूरचे हरिलाल जाधव, वालिवचे दिलीप घुगे, आचोळेचे सुजितकुमार पवार , नालासोपाराचे विशाल वळवी व वसई पोलीस ठाण्याचे बाळकृष्ण घाडीगावकर यांना आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्याच पोलीस ठाण्यात कायम केले आहे .
अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सदर बदल्या व नियुक्त्यांचे आदेश सोमवार १३ जानेवारी रोजी जारी केले आहेत .