ठाणे : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयती निमित्ताने संपन्न होणाऱ्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातून स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगले काम करणारे तब्बल २०० प्रतिनिधी गुजरात येथील साबरमतीला रवाना झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता या विभागाच्या नियंत्रणात पाठवण्यात आले आहेत. या कार्यक्र मासाठी रवाना झालेल्यांना प्रतिनिधीच्या बसला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी हिरवा झेंडा दाखवत यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, स्वच्छग्रही, महिला बचत गटांच्या सदस्या आदी प्रतिनिधी शिवशाही बसने रवाना झाले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्याना मार्गदर्शन करणार आहे. यावेळी स्वच्छतेमध्ये विशेष कार्य करणाºया दोन व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
साबरमतीतील ‘स्वच्छ भारत दिवस’ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील २०० प्रतिनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 19:26 IST
या कार्यक्र मासाठी रवाना झालेल्यांना प्रतिनिधीच्या बसला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी हिरवा झेंडा दाखवत यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
साबरमतीतील ‘स्वच्छ भारत दिवस’ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील २०० प्रतिनिधी
ठळक मुद्देतब्बल २०० प्रतिनिधी गुजरात येथील साबरमतीला रवानापंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितना मार्गदर्शन करणार