वाड्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:30 IST2020-05-14T18:30:22+5:302020-05-14T18:30:28+5:30
वाडा शहरातील अंजनी नगर येथील 33 वर्षीय पुरूष हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.

वाड्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळले
वाडा : वाडा तालुक्यात कोरोना व्हायरसने प्रवेश केला असून तीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासन सतर्क झाले आहे. या रूग्णांना पुढील उपचारासाठी पालघर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
वाडा शहरातील अंजनी नगर येथील 33 वर्षीय पुरूष हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या तरूणाने उत्तर प्रदेश येथे प्रवास केला आहे.शहरातील सिध्देश्वर रोड येथील 22 वर्षीय तरूणी हिने रत्नागिरी येथे प्रवास केला असून तिची चाचणी केली असता तीही पाॅझिटिव्ह आढळली आहे.
तालुक्यातील गो-हे येथील 12 वर्षीय मुलगी हिने पनवेल येथे प्रवास केला असता तिचीही चाचणी केली असता तीही पाॅझिटिव्ह आढळली आहे. या तिनही रूग्णांची 10 मे रोजी तपासणी केली असता आज त्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार सुनील लहांगे यांनी दिली. या सर्वाना उपचारासाठी पालघर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती लहांगे यांनी दिली.