भिवंडीतील तीन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

By नितीन पंडित | Updated: January 2, 2023 19:26 IST2023-01-02T19:25:06+5:302023-01-02T19:26:08+5:30

भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली.

Three inn criminals deported from Bhiwandi | भिवंडीतील तीन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

भिवंडीतील तीन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

भिवंडी- भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांवर ढवळे यांनी हद्दपार केले असल्याची माहिती सोमवारी दिली आहे. पोलीस उपयुक्तांच्या या धडक हद्दपार कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फौजान मतीन शेख वय २२ वर्ष, दानिश मतीन शेख वय ३० वर्ष व सारीक सोहराब खान व २१ वर्ष या तीन आरोपींना हद्दपार करण्यात आले असून या तीनही आरोपीन विरोधात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात असल्याने भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या तीनही आरोपींना विरोधात हद्दपारची कारवाई केली आहे.

Web Title: Three inn criminals deported from Bhiwandi

टॅग्स :thaneठाणे