मुंब्रा येथे रुमचा स्लॅब कोसळल्याने तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:36+5:302021-03-25T04:39:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : येथील आनंद कोळीवाडा परिसरातील विशाखा अपार्टमेंट या तळ अधिक चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ...

मुंब्रा येथे रुमचा स्लॅब कोसळल्याने तीन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : येथील आनंद कोळीवाडा परिसरातील विशाखा अपार्टमेंट या तळ अधिक चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका रुमचा स्लॅब बुधवारी संध्याकाळी ७ वाजता तिसऱ्या मजल्याच्या रुमवर कोसळला. या घटनेत त्या घरातील तिघे जण किरकोळ जखमी झाले असून, जखमींपैकी एका महिलेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, इमारत रिक्त करण्यात आली आहे. इमारतीमधील १६ कुटुंबांनी त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था स्वत: केली आहे. गुरुवारी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर इमारतीबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी लोकमतला दिली.