उल्हासनगरात जुन्या रागातून मारहाणीच्या तीन घटना 

By सदानंद नाईक | Updated: April 15, 2025 18:11 IST2025-04-15T18:10:57+5:302025-04-15T18:11:41+5:30

पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

three incidents of beating over old grudges in ulhasnagar | उल्हासनगरात जुन्या रागातून मारहाणीच्या तीन घटना 

उल्हासनगरात जुन्या रागातून मारहाणीच्या तीन घटना 

सदानंद नाईक, उल्हासनगर : जुन्या वादातून शिवीगाळ व मारहाण झाल्याच्या तीन घटना १४ एप्रिल रोजी विठ्ठलवाडी व उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. याप्रकरणी एकूण ८ जणावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-२, भैयासाहेब आंबेडकरनगर येथीलकमानी जवळ १४ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता राज रामसिंग गुहरे हे मित्र बलराम बारवसा व सुमित खैरालिया यांच्या सोबत गप्पा मारत होते. त्यावेळी उंदु उर्फ तुकाराम पैकराव व अक्षय उर्फ शंकर पडघने यांनी जुन्या रागातून राज गुहरे याला मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर दुसऱ्या घटनेत हंश धर्मेंद्र मुलचंदानी हे १४ एप्रिल रोजी रात्री दिड वाजता मित्र पियुष छाब्रिया व राम मोटवानी यांच्या सोबत गप्पा करीत होते. त्यावेळी अनोळखी इसमानी सनी मोटवानी यांच्याशी झालेल्या भांडणाच्या रागातून जबर मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणा विरोधात गुन्हा दाखल झाला.

 तिसऱ्या घटनेत कॅम्प नं-४ येथील सुभाष टेकडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला १४ एप्रिल रोजी दिड वाजता ऋषिकेश जमदाडे यांनी हार अर्पण करून घरी परत जात असताना डि्फेन्स किराणा दुकानाच्या गल्लीत जुन्या रागातून निलेश ब्राम्हणे यांच्यासह दोन अनोळखी इसमानी जमदाडे यांना मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: three incidents of beating over old grudges in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.