लॉजवरील धाडीत तीन मुलींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST2021-03-31T04:40:38+5:302021-03-31T04:40:38+5:30

मीरा रोड : मीरा रोडच्या दीपक रुग्णालयासमोरील पय्याडे लॉजिंग बोर्डिंगमध्ये अनैतिक मानवी वाहतूक शाखेने धाड टाकून तीन पीडित मुलींची ...

Three girls rescued in a raid on a lodge | लॉजवरील धाडीत तीन मुलींची सुटका

लॉजवरील धाडीत तीन मुलींची सुटका

मीरा रोड : मीरा रोडच्या दीपक रुग्णालयासमोरील पय्याडे लॉजिंग बोर्डिंगमध्ये अनैतिक मानवी वाहतूक शाखेने धाड टाकून तीन पीडित मुलींची सोमवारी सुटका केली. यात एक अल्पवयीन मुलगी असून पोलिसांनी दलालास अटक केली आहे.

नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल पय्याडे रेसिडेन्सीमध्ये एक दलाल वेश्यागमनासाठी मुलींना घेऊन येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संपत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून दलाल टुटून ऊर्फ तापस रवींद्र घोराई (४०) रा. कोलकत्ता, पश्चिम बंगाल याला अटक केली. टुटून व त्याचा एक साथीदार पैशांच्या मोबदल्यात मुली पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी तीन पीडित मुलींची सुटका केली असून त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. पीडितांना सुधारगृहात पाठवले आहे. नयानगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three girls rescued in a raid on a lodge