डोंबिवलीत मॅनहोल मध्ये गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 17:41 IST2018-10-26T17:40:14+5:302018-10-26T17:41:48+5:30
मॅनहोलमध्ये पडून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील खंबाळपाडा रोडवरील पायल मार्बल परिसरात घडली.

डोंबिवलीत मॅनहोल मध्ये गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
डोंबिवली - मॅनहोलमध्ये पडून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील खंबाळपाडा रोडवरील पायल मार्बल परिसरात घडली. संध्याकाळी ४ च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत देविदास चंद्रभान पाजगे (३०), महादेव धोंडीराम झोपे (३८) आणि चंद्रभान या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, अग्निशमन दलाने या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
आज संध्याकाळी चारच्या सुमारास यातील एकजण मॅनहोल सफाई साठी उतरला असता त्याचा गुदमरून मृत्यू झाला. तो बाहेर आला नाही यासाठी त्याच्या मागोमाग अन्य दोघेजण उतरले. मात्र त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर अग्निशमन दलाला बचावासाठी पाचारण करण्यात आले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी तिन्ही सफाई कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.