कोकणी पाड्यातील आदिवासींचे शेतीसह घराचे १५१ दावे वन हक्क समितीव्दारे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:55 IST2019-11-18T15:46:04+5:302019-11-18T15:55:41+5:30
कोकणीपाड्यातील या आदिवासी शेतकऱ्यांकडून वनहक्कांसाठी शेतीचे १८७ वनहक्क दावे वर्तकनगर प्रभाग समित द्वारे उपविभागीय-स्तरीय वनहक्क समिती ठाणे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केले होते. यापैकी १२ शेतीचे दावे मंजूर करण्यात आले. तर घरासाठीचे १५७ दावे मंजुरीसाठी समितीकडे सादर केले असता १८ दावे हे पुराव्या अभावी नामंजूर केले

शेतीचे १२ दावे तर घराचे १३९ वनहक्क आदी १५१ दावे यावेळी समितीने घेतलेल्या बैठकीव्दारे मंजूर करण्यात आले. याशिवाय संबंधीत दावेदारांना तत्काळ पत्रांचे वाटप
ठाणे : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी म्हणजे वन हक्कांची मान्यता अधिनियमानुसार येथील मौजे कोकणीपाड्यातील शेतकऱ्यांसह रहिवाश्यांचे वनहक्काचे दावे वर्तकनगर प्रभाग समितीव्दारे उपविभाग स्तरीय वनहक्क समितींने शनिवारी मंजूर केले. यामध्ये शेतीचे १२ दावे तर घराचे १३९ वनहक्क आदी १५१ दावे यावेळी समितीने घेतलेल्या बैठकीव्दारे मंजूर करण्यात आले. याशिवाय संबंधीत दावेदारांना तत्काळ पत्रांचे वाटप देखील यावेळी झाले.
कोकणीपाड्यातील या आदिवासी शेतकऱ्यांकडून वनहक्कांसाठी शेतीचे १८७ वनहक्क दावे वर्तकनगर प्रभाग समित द्वारे उपविभागीय-स्तरीय वनहक्क समिती ठाणे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केले होते. यापैकी १२ शेतीचे दावे मंजूर करण्यात आले. तर घरासाठीचे १५७ दावे मंजुरीसाठी समितीकडे सादर केले असता १८ दावे हे पुराव्या अभावी नामंजूर केले आणि १३९ घराच्या दाव्यांना समितीने यावेळी मंजुरी दिली. यावेळी ज्या शेतकऱ्यांचे शेती संबंधी दावे व रहिवाश्यांचे घरासंबंधीचे दावे नामंजूर झालेले आहेत. या विरोधात संबंधीत दावेदाराना सुमारे ६० दिवसात अपील दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे.
येथील संजय गांधी राष्टÑीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या या जंगलातील कोकणी पाड्यातील वनहक्क समिती ही वनहक्कांसाठी २००६ पासून लढाई लढत आहेत. शनिवारी त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे या आदिवासींच्या १२ वर्षांच्या लढ्याला यश प्राप्त झाल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या कोकणी पाड्याच्या वनहक्क समितीचे अध्यक्ष रामचंद्र गावंडे, सचिव मनिष मोवळे, सदस्य व प्रभाग समिती सदस्य जयराम राऊत , प्रभू बु. चौधरी , महादू गावित, परशुराम दळवी, अर्जुन चौधरी, सुंदरबाई महाले, अनुसया महाले, चांगुणा मोकाशी, सुरेखा पागी आदींनी वनहक्क समिती व प्रभाग स्तरीय समितीने केलेल्या सहकार्याचे समाधान गावकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले.