शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन म्हशींचे दुधाचे सड कापले

By admin | Updated: November 13, 2016 01:02 IST

मांगरूळ गावातील पाटील कुटुंबीयांच्या मालकीच्या ७ म्हशींपैकी तीन म्हशींचे दुधारे सर (दुधाचा भाग) कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस

अंबरनाथ : मांगरूळ गावातील पाटील कुटुंबीयांच्या मालकीच्या ७ म्हशींपैकी तीन म्हशींचे दुधारे सर (दुधाचा भाग) कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. या तीनही म्हशी बचावल्या तरी मुक्या प्राण्यांवर झालेल्या या संतापजनक प्रकारामुळे ग्रामस्थ प्रचंड चिडलेले आहेत. हा प्रकार कोणी केला, याबाबत काही कल्पना नसली तरी एखाद्या माथेफिरूने हा प्रकार केल्याचा संशय पाटील कुटुंबीयांना आहे.अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड रस्त्यावरील मांगरूळ गावात हा प्रकार घडला आहे. येथे राहणारे लक्ष्मण पाटील हे ३० वर्षांपासून म्हशीच्या दुधाचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर चालत असल्याने कुटुंबातील सदस्यांप्रमाणे पाटील कुटुंबीय या म्हशींची देखरेख करतात. मात्र, गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटे अज्ञात माथेफिरूने गोठ्यात प्रवेश करून ७ पैकी ३ म्हशींचे दुधाचे सर कापले. यामुळे या म्हशी त्रासाने बेचैन झाल्या होत्या. सकाळी लक्ष्मण पाटील गोठ्यात आल्यावर त्यांना एका म्हशीची सर दुखावली गेल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी त्या म्हशीचे दूध न काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या म्हशीकडे वळल्यावरही तोच प्रकार दिसला. त्यानंतर, त्यांनी सर्व म्हशींची चाचपणी केल्यावर तीन म्हशींचे सर कापल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच पशुवैद्यकीय रुग्णालयातून डॉक्टरांना उपचारासाठी बोलवले. तसेच या प्रकरणाची तक्रार त्यांनी हिललाइन पोलीस ठाण्यात दिली. या अमानवी कृत्यामुळे तीनही म्हशींचे जीव धोक्यात आले होते. आता त्यांचा जीव वाचला असला तरी त्या यापुढे दूध देऊ शकणार नसल्याने पाटील कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुधाच्या व्यवसायाच्या रागातून की, वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडला, याचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)