शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील तिघा सट्टेबाजांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: April 26, 2024 20:48 IST

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: १२ मोबाईल फोनसह एक टॅब आणि एक लॅपटॉप हस्तगत

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आरसीबी आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी ट्वेट्टी आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगड मधील शानू ललित बेरीवाल (३०), रजत बाबूला शर्मा, (३०) आणि विजय सिताराम देवगन (४०) या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने भिवंडी, कोनगाव येथील एका लॉजमधून अटक केली. त्यांच्याकडून १२ मोबाईल फोन, एक टॅब आणि एक लॅपटाॅप असा एक लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विराेधी पथकातील पाेलिस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने सापळा रचून २५ एप्रिल २०२४ रोजी भिवंडी, कोनगाव येथील हॉटेल के.एन.पार्क, येथे छत्तीसगड येथील त्रिकुटाला आएपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडले. त्यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉप मध्ये 'सुभलाभ' नावाचे सॉफ्टवेअर मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांकडून घेतलेल्या सट्टयाची माहिती भरून रियलमी पॅड टॅब मध्ये 'ताज ७७७ स्पोर्ट' अॅप्लीकेशन वर आरसीबी व सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी २० मॅच लाईव्ह बघून, सट्टा लावणाऱ्या इतरांकडून ११ लाख ८६ हजार ८११ रुपयांचा सट्टा स्विकारला.

तसेच रेड मी ९ कंपनीच्या मोबाईल मध्ये 'सुपर असिस्टंट' अॅप्लीकेशन मध्ये फरार सट्टेबाज जानू यांची १९ क्रमांकाची बुकीची बेटींग लाईन घेवून तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा लावला. तसेच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेवून शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिन्ही आराेपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ते छत्तीसगड येथून आयपीएल मॅचवर सट्टा लावत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी