जैन मंदिराची दानपेटी चोरणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST2021-07-31T04:40:35+5:302021-07-31T04:40:35+5:30

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या देवचंदनगर येथील जैन मंदिराच्या गाभाऱ्यातील लोखंडी जाळी तोडून दानपेटी चोरणाऱ्या तिघा आरोपींना भाईंदर पोलिसांनी ...

Three arrested for stealing Jain temple donation box | जैन मंदिराची दानपेटी चोरणाऱ्या तिघांना अटक

जैन मंदिराची दानपेटी चोरणाऱ्या तिघांना अटक

मीरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या देवचंदनगर येथील जैन मंदिराच्या गाभाऱ्यातील लोखंडी जाळी तोडून दानपेटी चोरणाऱ्या तिघा आरोपींना भाईंदर पोलिसांनी अटक करून चोरीचा ऐवज जप्त केला.

दि. २० जुलै रोजी सायंकाळी मंदिर बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरातील लोखंडी जाळी तोडून दानपेटी चोरी झाल्याचे उघडकीस आले. २८ जुलै रोजी कल्पेश दोशी यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण कदम, राहुल गावडे, स्वप्नील वेलेकर, वाल्मीक मुंडे, संतोष सानप आदींच्या पथकाने तपास करत २९ जुलै रोजी नंदाराम न्योपाने (४४), जनक टकाल (३२) व गणेश न्योपाने (२६) या तिघांना अटक केली. दानपेटीतील नऊ हजारांपैकी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

...........

वाचली

Web Title: Three arrested for stealing Jain temple donation box