प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Published: March 3, 2021 03:09 PM2021-03-03T15:09:28+5:302021-03-03T20:44:03+5:30

पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली.

Three arrested for murdering husband with the help of boyfriend | प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक

मुंब्रा पोलिसांनी लावला खूनाचा छडा

Next
ठळक मुद्देमुंब्रा पोलिसांनी लावला खूनाचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. सुरुवातीला कोणताही धागादोरा नसतांना मोठया कौशल्याने मुंब्रा पोलिसांनी या खूनाचा छडा लावला.
मुंब्रा येथील खाडीवरील जुन्या पुलाजवळील एमएम व्हॅलीकडे जाणाºया रस्त्याच्या वळणावर एका अनोळखीच्या गळयावर चॉपरने वार करुन त्याचा खून केल्याचे २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास आढळले होते. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या खूनातील मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या खूनाच्या तपासासाठी विशेष पथकांच्या निर्मितीचे आदेश दिले होते. दरम्यान, हा मृतदेह अहमद शेख याचा असल्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सहायक पोलीस आयुक्त नीता पडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक रामचंद्र वळतकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि शहाजी शेळके यांच्या पथकाने अहमद शेखची पत्नी रक्सार आणि मेव्हणी रेश्मा यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यातूनच त्यांच्यावर या पथकाचा संशय बळावला. त्यानंतर या पथकाने त्यांच्या सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली. तेंव्हा रुक्सारचा प्रियकर मोहम्मद नफील शेख (३०) याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये अहमद याची पत्नी रुक्सार आणि मेव्हणी रेश्मा (२८) यांच्याशी संगनमत करुन अहमद दाऊद शेख याचा खून केल्याची कबूली दिली. त्यानंतर मोहमद शेख, रुक्सार आणि रेश्मा या तिघांना २ मार्च रोजी मुंब्रा पोलिसांनी अटक केली.
* असा घडला प्रकार:
अहमद हा त्याची पत्नी रुक्सार हिला नेहमी क्षुल्लक कारणावरुन मारहाण करीत होता. याच मारहाणीला कंटाळून तिने प्रियकर मोहमद आणि रश्मी यांच्याशी २४ फेब्रुवारी रोजी पतीला मारण्याचा कट केला. याच कटातून २७ फेब्रुवारी रोजी त्याचा खून करण्यात आला. मात्र, मुंब्रा पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Three arrested for murdering husband with the help of boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.