शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियनसह तिघांना अटक; २.१५ कोटींचे एमडी व कोकेन जप्त, कल्याण परिमंडळ तीनची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:20 IST

तिघांच्या अंगझडतीत त्यांच्याकडे २ कोटी ८० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन व १५ लाख रुपये किमतीचे कोकेन असा अंमली पदार्थ सापडला.

डोंबिवली : पूर्वेकडील गणेश नगर, उंबर्ली गाव परिसरात कल्याण परिमंडळ तीनच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष कारवाई करत एका ३६ वर्षीय नायजेरियन नागरिकासह अविनाश व्यंकटेश सदरला (३४) आणि गजेंद्रन संजीव नायडू (३४ दोघेही रा. अंबरनाथ) या तिघा अंमली पदार्थ विक्रेत्यांना शुक्रवारी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ कोटी १५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन व कोकेन जप्त करण्यात आले. कल्याण न्यायालयाने तिघांनाही १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक गस्तीवर असताना सार्वजनिक रस्त्याच्या कडेला संशयास्पद हालचाली करत असताना हे तिघे पोलिसांना आढळले. त्यापैकी एक जण पाठीवर बॅग  घेऊन दुचाकीवर बसला होता. दुचाकीच्या पुढील व मागील नंबर प्लेट वाकविलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पथकाने चौकशीसाठी जवळ जाताच तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परतेने त्यांना ताब्यात घेतले.

तिघांच्या अंगझडतीत त्यांच्याकडे २ कोटी ८० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन व १५ लाख रुपये किमतीचे कोकेन असा अंमली पदार्थ सापडला. याशिवाय २१,५०० रुपयांची रोख रक्कम, एक दुचाकी आणि एक काळी बॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Three arrested, including Nigerian, with ₹2.15 crore drugs seized.

Web Summary : Dombivli police arrested three drug peddlers, including a Nigerian national, seizing ₹2.15 crore worth of mephedrone and cocaine. The accused were caught with drugs, cash, and a motorcycle after a suspicious activity was noticed during patrolling. Court remanded them to police custody until February 17.
टॅग्स :Drugsअमली पदार्थdombivaliडोंबिवली