ठाण्यात भाजपा पुरस्कृत नगरसेवकाविरुद्ध विनयभंगासह धमकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 09:43 PM2019-12-24T21:43:27+5:302019-12-24T21:51:15+5:30

ठाणे महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक विलास कांबळे याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडित महिलेने पुन्हा त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आता विनयभंगासह धमकीचा गुन्हा सोमवारी दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 Threatening crime against a BJP-sponsored corporator in Thane with humiliation | ठाण्यात भाजपा पुरस्कृत नगरसेवकाविरुद्ध विनयभंगासह धमकीचा गुन्हा

ठाणे न्यायालयाच्या आवारातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्दे लैंगिक अत्याचार झालेल्या पिडितेने केला आरोपठाणे न्यायालयाच्या आवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील इंदिरानगर भागातील ठाणे महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक विलास कांबळे याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडित महिलेने पुन्हा त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आता विनयभंगासह धमकीचा गुन्हा सोमवारी दाखल केला.
या घटनेतील पीडित महिला बारमध्ये सिंगर असून ती सावरकरनगर येथे वास्तव्याला आहे. कांबळे यांनी तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करून कांबळेसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध १ सप्टेंबर २०१९ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित महिला २३ डिसेंबर रोजी आपल्या बहिणीसह या गुन्ह्यासंदर्भातील न्यायालयीन कामासाठी ठाणे न्यायालय परिसरात आली होती. त्यावेळी कांबळे याने पीडित महिलेकडे पाहून अश्लील वर्तन केले. याचा जाब विचारण्यास तिची बहिण गेली असता कांबळे यांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिने आणि बहिणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात कांबळेंविरुद्ध विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाणे नगर पोलिसांनी सांगितले.

 

Web Title:  Threatening crime against a BJP-sponsored corporator in Thane with humiliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.