शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हजारो विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’चा लाभ, महापालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:11 IST

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१८-१९ या वर्षातील अंदाजपत्रकामध्ये केलेल्या १६,५९,१२,७१४ तरतूदीपैकी रक्कम १२ कोटी ८४ लाख २६ हजार १२७ इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.

ठाणे  - ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१८-१९ या वर्षातील अंदाजपत्रकामध्ये केलेल्या १६,५९,१२,७१४ तरतूदीपैकी रक्कम १२ कोटी ८४ लाख २६ हजार १२७ इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. डीबीटी (डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर) योजनेतंर्गत विद्यार्थीनिहाय विहित केलेले अनुदान त्यांच्या बँक खात्यावरच जमा केले असून याबाबत शिक्षण विभागाकडे विद्यार्थी, पालक किंवा इतरांमार्फत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. त्याचप्रमाण ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल किंवा शाळा सोडल्याचे दाखले हे थांबविण्यात आले नसल्याचा दावा उपायुक्त (शिक्षण) मनीष जोशी यांनी केला आहे.मतदाता जागरण अभियानाचे संजीव साने यांनी ठामपा शिक्षण विभागाच्या डीबीटी योजनेतील गोंधळाचा वर्ग आणि विद्यार्थी संख्येनिहाय लेखाजोखा मांडल्यानंतर महापालिकेने हा दावा केला आहे.ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने तसेच एकापेक्षा अधिक मुले महापालिकेच्या शाळेत शिकत असल्याने शैक्षणिक साहित्य आगाऊ खरेदी करणे शक्य नसून त्याचा पुरावठा शालेय व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली करण्यात यावा, असा ठराव संमत झाला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. तसेच ते गुणवर्णनप्रमाणे नव्हते, ते व्यवस्थापन समितीतर्फे बदलून घेण्यात आले. ते स्पेसिफिकेशननुसार व सुस्थितीत असल्याबाबत प्रमाणपत्र मुख्याध्यापकांनी सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांया बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केल्याचे मनीष जोशी यांनी सांगितले.शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून वस्तूनिहाय बाजारभाव तसेच गुणवर्णन निश्चित करण्यात आले असून याबाबत मुख्याध्यापकांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.कोणत्याही विद्यार्थ्यांवर ठराविक ठेकेदाराकडून वस्तू खरेदी करणेबाबत सक्ती करू नये असे परिपत्रक काढण्यात आले. आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका