शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

एसआरएच्या जागेवरील कारवाईमुळे  ठाणेच्या सुभाषनगरमधील १०० पेक्षा अधिक घरे  जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 6:41 PM

सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देसुमारे सात एकरच्या या भूखंडावर रहिवाशांसाठी एसआरए योजना सुमारे २६० घरांचा प्रस्ताव आहे. यातील ११९ घरे तोडणे अपेक्षित भाड्याचे घरे घेऊन निवास व्यवस्था केली आहेइमारत बांधूनपूर्ण होईपर्यंत विकासकाला घर भाडे द्यावे लागेल

ठाणे : येथील पोखरणरोड नं. २वरील सुभाषनगर परिसरातील एसआरएच्या जागेवरील घरे तोडण्यासाठी शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. पात्र असलेल्या या रहिवाशांना एसआरएचे घरे बांधून देण्यासाठी ही कारवाई केली. सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी यांनी लोकमतला सांगितले.तोडण्यात आलेले घरे एसआरएच्या जागेवर आहे. त्यातील रहिवाशी एसआरए योजनेस पात्र आहे. त्या जागेवर एसआरएव्दारे इमारती बांधणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागा मोकळी होणे गरजेचे असल्यामुळे ही कारवाई झाली. मात्र त्या आधी या रहिवाशांची अन्यत्र निवास व्यवस्था करण्यात आली असून काही रहिवाशी ट्रॅस्टीट कॅम्पमध्ये तर काहींनी भाड्याचे घरे घेऊन निवास व्यवस्था केली आहे. यासाठी संबंधीत विकासकांने रहिवाशाना घराचे भाडे देऊन अन्यत्र व्यवस्था केली आहे. इमारत बांधूनपूर्ण होईपर्यंत विकासकाला घर भाडे द्यावे लागेल. त्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्याची ही तरतूद आहे. मात्र रहिवाशांना याची खात्री पटत नव्हती., त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे बहुतांशी लोकांनी घरे खाली केली नव्हती. त्यांच्यातील मतभेद व विकासकाशी जुळवून न घेण्याचा वादही होता. पण आता त्यांना खात्री पटवून दिली आहे. यामुळे ११४ रहिवाशाना नोटीस काढून घरे तोडण्यात आली. त्यांनी आधीच आपले साहित्य अन्यत्र हलवले असल्यामुळे कारवाईला विरोध झालेला नसून शांततेत व निर्विघ्न कारवाई करता आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.सुमारे सात एकरच्या या भूखंडावर रहिवाशांसाठी एसआरए योजना राबवण्यात येत आहेत. येथील सर्व रहिवाशी या योजनेस पात्र आहेत. पण अविश्वास आणि मतभेद, वादविवादातून ते घरे सोडण्यास तयार नव्हते. त्यातील काहींच्या तक्रारीही होत्या. याकडे लक्ष केंद्रीत करून आजही कारवाई करण्यात आली. या भूखंडवरील काही घरे धोकादायक असल्याचे टीएमसीने आधीच घोषीत केलेले आहेत. येथील सुमारे २६० घरांचा प्रस्ताव आहे. यातील ११९ घरे तोडणे अपेक्षित आहे. त्यातील ११४ घरांना नोटीस काढून ही कारवाई केली. पण यापेक्षा जास्त घरांवरील कारवाईसाठी रहिवाशांनी प्रतिसाद दिल्यामुळे ते शक्य झाले. कोणीही विरोध दर्शवला नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला. या कारवाईसाठी ११० जणांच्या मनुष्यबळासह १०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी, काही बुल्डोझर आणि कर्मचाऱ्यांनी या घरांवर कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेcity chowkसिटी चौक