शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

गणेशपूजनासाठी ठाणे जिल्ह्यात पाच हजार पुरोहित, परराज्यांतून मिळतोय प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:38 AM

गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमधील एकूण पाच हजार पुरोहित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. डोंबिवलीतच एक हजार पुरोहित येतात.

- जान्हवी मोर्ये।डोंबिवली : गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमधील एकूण पाच हजार पुरोहित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. डोंबिवलीतच एक हजार पुरोहित येतात. त्यात परराज्यांसह कोकण, मराठवाडा, खान्देश येथील पुरोहितही आहेत.डोंबिवलीतील ल.कृ. पारेकर गुरुजी यांनी सांगितले, श्रावण ते गणपती आणि नवरात्रात बाहेरून पुरोहित ठाणे उपनगरांत येतात. अनेक पुरोहितांचे यजमान ठरलेले आहेत. ते त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून येथे येतात. गणेशपूजनासाठी त्यांचा चार दिवस मुक्काम असतो. डोंबिवली यजुर्वेदीय आणि ऋग्वेदीय पुरोहित मंडळे आहेत. मात्र, पुरोहितांना गणेशपूजनाची कामे मंडळांपेक्षा एकमेकांच्या ओळखीने मिळतात. अथर्वशीर्ष मंत्रपठण करणारे मंडळही येथे आहे. हे मंडळ मंत्रपठणासाठी पुरोहित पुरवते.काही पुरोहित गणेशमूर्ती स्थापनेची वेळ सूर्योदयापूर्वी ते माध्यान्हापर्यंत पाळतात. या वेळेत एका पुरोहिताकडून किमान सात ते आठ गणेशमूर्तींची स्थापना होते. घरगुती गणेशपूजन व स्थापनेचा मुहूर्त अनेक वेळा पाळला जातो. परंतु, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत माध्यान्हापर्यंतची मुहूर्ताची वेळ पाळली जात नाही.दिवसभरात कधीही गणेशाची स्थापना क रता येऊ शकते. भद्रायोग आणि मंगळाचा होरा पाहून गणेशमूर्तीची स्थापना केली जाते, असे काही ज्योतिषी सांगतात. परंतु, त्याला काही शास्त्राचा आधार नाही. त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालते.डोंबिवलीत घरगुती व सार्वजनिक मंडळे, अशी मिळून सव्वा लाख गणेशमूर्तींची स्थापना होते. परराज्यांतून येणारे एक हजार पुरोहित सोडून खुद्द शहरात आठ हजार पुरोहित पौरोहित्य करतात. हे आठ हजार पुरोहित उच्चशिक्षित आहेत, तर काही निवृत्तही झालेले आहेत.सध्या सोशल मीडिया व डॉट कॉमचा जमाना आहे. त्यामुळे इंटरनेट, चॅनल, कॅसेट, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूजा सांगितली जाते. त्याचा फायदा पुरोहितांना होत आहे. याद्वारेही पूजेसाठी नोंदणी केली जाते. मात्र, त्याचे प्रमाण फारसे लक्षणीय नाही. या माध्यमातून भक्तांनाविविध सुविधा देऊन आकर्षित केले जाते. त्यामुळे ही सेवा त्यांना स्वस्तात पडते.पारेकर यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांच्याकडे ४० गणेशपूजनाची नोंदणी झाली आहे. परराज्यांतून त्यांच्याकडे चार पुरोहित आले आहेत. ते त्यांच्यासोबत वास्तव्याला आहे. गौरी विसर्जनानंतर ते त्यांचे काम आटोपून घरी परतणार आहेत.‘पूजनाचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे’घरगुती, सार्वजनिक मंडळांबरोबर कंपन्या, मॉलमध्येही गणेशोत्सव साजरा होतो. तेथे गणेशमूर्ती स्थापनेसाठी किमान पाच हजार रुपयांची दक्षिणा मिळते. एका पूजनाचे एका पुरोहिताला ११०० ते २१०० रुपये दक्षिणा मिळते.भक्त गणेशोत्सवात दिवाळीसारखाच खर्च करतो. गणेशोत्सवाला ‘फंक्शन’चे स्वरूप आले आहे. पुरोहिताकडून पूजन केले, तरी ते उत्साही असावे. धार्मिक व पारंपरिक पद्धतीने पूजा सांगितली जावी. त्यातून पूजेचे आणि पूजनाचे पावित्र्य जपले जाईल, असे पारेकर म्हणाले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव