शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात डीजेचा दणदणाटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 03:45 IST

मनसे, राष्ट्रवादीची भूमिका; शिवसेना मात्र न्यायालयीन आदेश पाळणार

ठाणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. परंतु, न्यायालयाचा अंतिम निर्णय काहीही येवो आम्ही विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट करणारच, अशी ठाम भूमिका ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्टÑवादीने घेतली आहे. तर शिवसेनेने मात्र आम्ही न्यायालयाच्या अधीन राहूनच विसर्जन मिरवणूक काढू, असे स्पष्ट केले आहे.काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू नये, असे स्पष्ट केले आहे. या संदर्भातील पुढील निकाल १९ सप्टेंबर रोजी लागणार आहे. याच अनुषंगाने सोमवारी डिजे संघटनांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. परंतु, न्यायालयाच्या निर्णयापर्यंत त्यांनी या सर्वांना थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. दुसरीकडे खासदार उदनराजे भोसले यांनी तर काही झाले तरी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. आता ठाण्यातही राष्टÑवादी आणि मनसेने हीच भूमिका घेऊन विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट होणारच, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विसर्जन मिरवणुकींकडे सर्वांचेच लक्ष लागलेआहे.न्यायालय आता प्रत्येक वेळेस दैनंदिन जीवनातही हस्तक्षेप करू लागले आहे. माणसाने कसे जगयाचे, आवाज किती करायचा याचा निर्णय जर न्यायालयच घेणार असेल तर सर्वसामान्यांनी करायचे काय? असे मत राष्टÑवादीने व्यक्त केले. तर प्रत्येक वेळेस सणांच्या काळात अशा अडचणी येत आहेत, त्यावर मात करण्याची वेळ आल्याचे मनसेने म्हटले आहे.कोर्टाचे आदेश जे काही येतील तेव्हा येतील. परंतु, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवणारच.- अविनाश जाधव - ठाणे जिल्हा अध्यक्ष, मनसेदरवर्षी ज्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली जाते त्याच पद्धतीने यंदाही ती काढली जाईल. यात कोणताही बदल केला जाणार नाही, डीजे हा वाजवणारच.- जितेंद्र आव्हाड - आमदार, राष्टÑवादीन्यायालयाने घालून दिलेल्या निर्णयानुसारच आमची सर्व मंडळे विसर्जन मिरवणूक काढतील. परंतु, डीजे असणार नाही.- नरेश म्हस्के - जिल्हाप्रमुख, शिवसेना - ठाणे

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवShiv SenaशिवसेनाMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस